शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य वाटणाऱ्या लक्षणांमुळे उद्भवू शकतो जीवघेणा पेरिटोनियल कॅन्सर, जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 13:31 IST

पेरिटोनियल कॅन्सर त्वचेच्या एपिथील्यल सेल्‍समध्ये विकसीत होत जातो.

कॅन्सरचे एक दोन नाही तर शंभरपेक्षा जास्त प्रकार आहेत. पण आपल्याला फक्त  कॅन्सरचे कॉमन असणारे काही प्रकार माहीत आहेत. त्यापैकीच एक पेरिटोनियल कॅन्सर आहे. हा कॅन्सरचा प्रकार जीवघेणा असून ऑन्कोलॉजिस्ट या कॅन्सरबाबत योग्य माहिती देऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला कर्करोगतज्ञांनी दिलेल्या पेरिटोनियल कॅन्सरची  लक्षणं सांगणार आहोत. 

काय आहे पेरिटोनियल कॅन्सर

पेरिटोनियल कॅन्सर त्वचेच्या एपिथील्यल सेल्‍समध्ये विकसीत होत जातो.  पोटाच्या आतल्या भागात झाकल्या गेलेल्या लाइनिंगला 'पेरिटोनियम असं म्हणतात.  त्यामुळे या कॅन्सरला पेरिटोनियल कॅन्सर म्हणतात. या पेरिटोनियममुळे अंतर्गत अवयव म्हणजेच लहान आतडे, मोठे आतडे, मुत्राशय, गर्भाशय आणि मलाशयाची सुरक्षा होत असते. पेरिटोनियम लायनिंगमध्ये एक घट्ट द्रवपदार्थ बाहेर येत असतो.  ज्यावेळी या कॅन्सरची लक्षणं जाणवतात. त्यावेळी अनेकदा हा  कॅन्सर शेवटच्या स्टेजला पोहोचलेला असतो. 

(Image credit- cure today)

पेरिटोनियल कॅन्सरची लक्षणं

तीव्र पोटदुखी

एब्डोमिनल ब्‍लोटिंग

मुत्रमार्गात त्रास जाणवणं

वजायनातून पांढरे पाणी बाहेर येणं

आंबट ढेकर, उलट्या होणं

जास्त न खाता पोट भरल्यासारखं वाटणं

अचानक वजन कमी जास्त होणं.

श्वास  घ्यायला त्रास होणं.

(image credit-target ovarian cancer)

कारणं

पुरूषांच्या तुलनेत या प्रकारच्या  कॅन्सरचा सगळ्यात जास्त धोका महिलांना असतो. वाढत्या वयात या कॅन्सरचा धोका वाढत जातो. मध्यम वयीन तसंच वयस्कर लोकांना या आजाराचा जास्त धोका असतो.  अनुवांशिकतेमुळे सुद्धा हा आजार उद्भवतो.  लक्षणं जाणवत असल्यास तपासणी करणं गरजेंच आहे. लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना या प्रकारच्या कॅन्सरची समस्या उद्भवू शकते.  महिलांना मेनोपॉजच्या स्थितीत म्हणजेच ४५ ते ५५ वयोगटात हा कॅन्सर  होण्याची  शक्यता असते. यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं गरजेंच आहे. 

(फुफ्फुसांच्या आजारांचं कारण ठरू शकतं चेस्ट इन्फेक्शन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

(आता अँटीजन टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाची तपासणी होणार; कशी होते 'ही' टेस्ट जाणून घ्या)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोग