शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला 'हे' आजार असल्यास पेरुला हातही लावू नका, उलट वाढतील आजाराचे दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 16:34 IST

पेरूची पाने खाल्ल्याने हृदय, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते . मात्र, त्यात काही गोष्टी आहेत ज्या 'या' आजारांच्या रुग्णांसाठी हानिकारक आहेत.

पेरू हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे. ज्यामध्ये कॅलरी खूप कमी आणि फायबर जास्त आहे. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरूचे फळच नव्हे तर त्याची पानेही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पेरूची पाने खाल्ल्याने हृदय, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते . मात्र, त्यात काही गोष्टी आहेत ज्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

पेरूमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. एका पेरूमध्ये ११२ कॅलरीज आणि २३ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, ९ ग्रॅम फायबर आणि स्टार्चची नगण्य मात्रा असते. अभ्यासात असे सांगितले गेले की मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे. कारण त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. यामध्ये फोलेट, बीटा कॅरेटिन सारखे पौष्टिक घटक असतात. जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पेरू खाणे टाळावे.

पोट फुगण्याची समस्या असणाऱ्यांनीपेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्रुक्टोज असतात. या दोन गोष्टी जास्त घेतल्याने सूज येते. जर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या असेल तर तुम्ही पेरु खाणे टाळावे. त्यात ४० टक्के फ्रुक्टोज असतात. जे शरीरात सहज शोषले जात नाहीत. यामुळे तुमची समस्या वाढू शकते. याशिवाय, झोपेच्या आधी लगेच पेरू खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

इरिटेबल बॉवेल सिंड्रोमने ग्रस्त व्यक्तीपेरूमध्ये भरपूर फायबर असते. जे बद्धकोष्ठता दूर करते आणि पचन उत्तेजित करण्यास मदत करते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनसंस्थेला नुकसान होऊ शकते. विशेषत: जर तुम्हाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा त्रास होत असेल तर आपण पेरू खाणे टाळलेच पाहिजे.

मधुमेहाचे रुग्णमधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. तथापि, आहारात त्याचा समावेश करण्यासह, रक्तातील साखरेच्या पातळीवर विशेष लक्ष द्या. १०० ग्रॅम चिरलेल्या पेरूमध्ये ९ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने साखरेची पातळी वाढू शकते. म्हणूनच आपण कमी प्रमाणात खाणे महत्वाचे आहे.

पेरू खाण्याची योग्य वेळतुम्ही दिवसभरात पेरू कधीही खाऊ शकतो. एकापेक्षा जास्त पेरू खाऊ नयेत. वर्कआउटच्या आधी आणि नंतर तुम्ही हे फळ खाऊ शकता. रात्रीच्या वेळी हे फळ खाल्ल्याने सर्दी आणि कफ होऊ शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स