शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता बिनधास्त लावा मित्रांसोबत पाणीपुरीची रेस, कारण पाणीपुरी खाल्ल्याने वजन होते खुपच कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 11:05 IST

बरेच लोक आहेत जे आपल्या आहाराबद्दल थोडेसे जागरूक आहेत आणि पाणीपुरी खाण्यास टाळाटाळ करतात. पाणीपुरी खाल्ल्याने वजनही कमी होते. होय! वाटले ना आश्चर्य… विश्वास बसत नसेल, तरी ही गोष्ट खरी आहे. वास्तविक, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यात ‘पाणीपुरी’ खूप मदत करते. 

पाणीपुरी किंवा गोलगप्पे खाणे अगदी सर्वांनाच आवडते. हा पदार्थ देशातील सगळ्यात आवडता स्ट्रीट स्नॅक्स आहे. तथापि, असे बरेच लोक आहेत जे आपल्या आहाराबद्दल थोडेसे जागरूक आहेत आणि पाणीपुरी खाण्यास टाळाटाळ करतात. पाणीपुरी खाल्ल्याने वजनही कमी होते. होय! वाटले ना आश्चर्य… विश्वास बसत नसेल, तरी ही गोष्ट खरी आहे. वास्तविक, शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यात ‘पाणीपुरी’ खूप मदत करते. 

असे होईल वजन कमी!पाणीपुरी खाल्ल्यानंतर भूक लागत नाही.पाणीपुरी ही लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी एक चांगला आरोग्यदायी स्नॅक्सचा पर्याय असू शकते. जर आपण बर्‍याच दिवसांपासून डाएट करत असाल आणि आपल्याला त्वरीत वजन कमी करायचे असेल, तर 6 पाणीपुरींची एक प्लेट आपले वजन कमी करण्यास मदत करू शकेल. हे खाल्ल्याने कित्येक तास भूक लागत नाही. तसेच, पाणीपुरी खाण्याबरोबर तुम्हाला दररोज वर्कआउटही करावे लागेल.

पाणीपुरीच्या पाण्याचे बरेच फायदे…आपल्याला पाणीपुरी आणि त्याच्या पाण्याचे बरेच फायदे मिळू शकतात. जर, तुम्ही पुदीना, जिरे आणि हिंगाचा वापर करून घरच्या घरी पाणीपुरीचे पाणी तयार केले, तर ते आपल्या पचनास उपयुक्त ठरेल. या पाण्यात आपण हिरवी ताजी कोथिंबीर देखील टाकू शकता. याने आपल्या शरीराला येणारी सूज कमी होईल.

पाणीपुरीच्या पाण्यातील हिंग मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते. तसेच यातील जिरे पचन क्रिया सुधारण्यास मदत करते. पाणीपुरीच्या पाण्यात पचनास फायदेशीर ठरणारे अनेक गुणधर्म आहेत. यातील जिरे तुमच्या तोंडाला गंध देखील प्रतिबंधित करते. पुदिन्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट असतात जे पचनास मदत करतात. यामुळे पोटातील वेदना देखील कमी होतात आणि अपचन नियंत्रित करण्यास मदत होते. इरिटेबल बाउल सिंड्रोम असलेल्या रूग्णांसाठी हे अतिशय फायदेशीर आहे (Health benefits of panipuri aka golgappa).

गोड चटणी खाणे टाळा!जर, आपल्याला पाणीपुरीतील आंबट किंवा तिखट पाणी आवडत नसेल आणि त्यात आपण गोड पाणी वापरत असाल, तर ते आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. म्हणूनच पाणीपुरीत शक्यतो आंबट किंवा पुदिनायुक्त पाणी वापरण्याचा प्रयत्न करा. पाणीपुरीच्या सारणासाठी बटाट्याचा वापर करण्याऐवजी हरभरा किंवा मूग स्प्राउट्सचे स्टफिंग बनवा. ते आरोग्यासाठी लाभदायी आहे आणि पाणीपुरीची चव देखील वाढवतात. अर्थात पाणीपुरी ही घरी बनवलेली असावी!

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स