इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या पोहोचपासून आदिवासी वाडया, दुर्गम भाग दूरच वर्षभरात गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिम जिल्हयात सुमार कामगिरी
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:47+5:302015-02-14T23:50:47+5:30
सर्वआवृत्तींसाठीपुणे : राज्यात राहणार्या गरीबातील गरीब व्यक्तीला तातडीच्या वेळी दारात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) गेल्या वर्षभरात आदिवासी वाडया व दुर्गम भागापासून दूरच राहिली आहे. गेल्या वर्षभरात मोठया शहरांमध्यील नागरिकांनाच ही सेवा सर्वाधिक देण्यात आलेली आहे. आदिवासी व दुर्गम जिल्हे असलेल्या गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिममध्ये या सेवेची कामगिरी सुमारच ठरली आहे.

इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या पोहोचपासून आदिवासी वाडया, दुर्गम भाग दूरच वर्षभरात गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिम जिल्हयात सुमार कामगिरी
स ्वआवृत्तींसाठीपुणे : राज्यात राहणार्या गरीबातील गरीब व्यक्तीला तातडीच्या वेळी दारात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, त्यांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) गेल्या वर्षभरात आदिवासी वाडया व दुर्गम भागापासून दूरच राहिली आहे. गेल्या वर्षभरात मोठया शहरांमध्यील नागरिकांनाच ही सेवा सर्वाधिक देण्यात आलेली आहे. आदिवासी व दुर्गम जिल्हे असलेल्या गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, नंदूरबार, रायगड, वाशिममध्ये या सेवेची कामगिरी सुमारच ठरली आहे.तातडीच्या वेळी वैद्यकीय सेवा न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण राज्यात खूप आहे. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी एकाच क्रमांकाची राज्यव्यापी रुग्णवाहिका सेवा असावी म्हणून गेल्यावर्षी २६ जानेवारीला राज्यशासनाच्या आरोग्य विभागाने कोटयावधी रूपये खर्च करून महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस सुरू केली होती. यासाठी राज्यभरात ९३७ अत्याधुनिक रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या. 'एक फोन करा तुम्ही कोठेही राहत असला तरी तुम्हाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका तुमच्या दारासमोर अवघ्या काही मिनिटांमध्ये उभी राहिल, अशी डरकाळी त्यावेळी राज्यशासनाने फोडली होती. मात्र या सेवेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीवरून ही डरकाळी फक्त डरकाळीच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.दि. २६ जानेवारी २०१४ ते २६ जानेवारी २०१५ या वर्षभरात गडचिरोलीतील केवळ १ हजार ४८५ जणांनाच या सेवेचा लाभ मिळाला आहे. त्यापाठोपाठ वर्धा जिल्हयात १ हजार ६१७ जणांना, सिंधुदुर्ग जिल्हयात १ हजार ७८२ लोकांना, रत्नागिरी जिल्हयात २ हजार १०० लोकांना, भंडारा जिल्हयातील २ हजार ६१० जणांना, नंदूरबार जिल्हयात २ हजार ८२५ जणांना, रायगड जिल्हयात ३ हजार १२ जणांना, वाशिम जिल्हयात केवळ २ हजार ६४६ जणांनाच या सेवेचा लाभ मिळाला आहे.याउलट मोठया शहरांमध्ये या सेवेने दुहेरी आकडा गाठला आहे. मुंबई जिल्हयामध्ये एकूण १७ हजार ९१२ जणांना, पुणे जिल्हयात १५ हजार ३१६ जणांना, नागपूर जिल्हयात ८ हजार १४१ जणांना, नांदेड जिल्हयात ८ हजार ५०३ जणांना, नाशिकमध्ये १० हजार १६९ जणांना, ठाणे जिल्हयात १० हजार २१२ जणांना या सेवेचा लाभ देण्यात आला आहे.या दोन्ही आकडेवारींची तुलना करता आदिवासी वाडयांवर, दुर्गम भागांमध्ये ही सेवा पोहोचतच नसल्याचे सिध्द होत आहे.