शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
5
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
6
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
8
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
9
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
10
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
11
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
13
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
14
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
15
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
16
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
17
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
18
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
19
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
20
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन

कोरोनाकाळात केवळ ८२ हजार लहान-मोठ्या शस्त्रक्रिया; राज्यातील मागील तीन महिन्यांची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 06:46 IST

पुण्यात एप्रिल ते जून या काळात ३,२६५ मोठ्या, तर ५,६१० लहान अशा एकूण ८,८७५ शस्त्रक्रिया झाल्या. २०१९-२० साली याच काळात पुण्यात १५,३७७ शस्त्रक्रिया झाल्या होत्या,

स्नेहा मोरे मुंबई : राज्यातील कोरोनाच्या संसर्गाचा असलेला धोका ओळखून सरकारी, पालिका व खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. तरीही कोरोनाकाळात म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीत लहान-मोठ्या मिळून ८२ हजार ८६० शस्त्रक्रिया पार पडल्या. कोरोनापूर्वीच्या तुलनेत या शस्त्रक्रियांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात २०१९-२० या वर्षात एप्रिल ते जूनदरम्यान लहान-मोठ्या १ लाख ७५ हजार १५८ शस्त्रक्रिया झाल्या. शस्त्रक्रियेदरम्यान कोरोना संसर्गाचा धोका अधिक होता, शिवाय रुग्णांमध्येही कोरोनाची मानसिक भीती असल्याने मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये खंड पडला.

पुण्यात एप्रिल ते जून या काळात ३,२६५ मोठ्या, तर ५,६१० लहान अशा एकूण ८,८७५ शस्त्रक्रिया झाल्या. २०१९-२० साली याच काळात पुण्यात १५,३७७ शस्त्रक्रिया झाल्या होत्या, त्यात मोठ्या ८,१०८ तर लहान ७ हजार २६९ शस्त्रक्रियांचा समावेश होता. मुंबईत कोरोनाकाळात तीन महिन्यांमध्ये १,६१६ मोठ्या, तर १,९९९ लहान अशा एकूण अवघ्या ३,६१५ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मागील वर्षी एप्रिल ते जून या काळात शहर-उपनगरात १६,३७८ मोठ्या, तर १५,९६३ लहान शस्त्रक्रिया मिळून एकूण ३२,३४१ शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या.

आता हळूहळू मुंबईसह राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले, कोरोनाच्या काळात अन्य आजारांच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. आता अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यातही हृदयविकाराशी निगडित आजार असणाऱ्यांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण अधिक आहे. नुकतीच राज्य सरकारने शस्त्रक्रियांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याची अंमलबजावणी केली जात आहे.अशी आहेत मार्गदर्शक तत्त्वेप्रकृती गंभीर असलेले रुग्ण, गर्भवती, तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या व्यक्तींची नॅट चाचणी करावी लागते. मात्र नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या रुग्णालयांत नॅट चाचणीची सुविधा नसेल अशा ठिकाणी अँटिजन चाचणी करून उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टी, बायपास, गर्भवती, ब्रेनडेड यासारख्या तातडीने आवश्यकता असलेल्या शस्त्रक्रियांचा मार्ग मोकळा झाला आहे. अँटिजन चाचणीमुळे या रुग्णांच्या शस्त्रक्रिया अवघ्या अर्ध्या तासात करणे शक्य होईल.मनोरुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांना तसेच तुरुंगामध्ये दाखल होणाºया कैद्यांना एक आठवडाच क्वारंटाइन ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अँटिजन चाचणी करून त्यानुसार त्यांना आयसोलेशन वॉर्ड किंवा रुग्णालयामधील संबंधित वॉर्डमध्ये दाखल करण्याचा निर्णय घ्यावा, अशा राज्य सरकारच्या सूचना आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस