शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सर्दी, डोकेदुखीसारख्या आजारांवर ऑनलाइन सल्ला, 'ई-संजीवनी'च्या माध्यमातून अनेक रुग्णांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:46 IST

ऑनलाइन ओपीडी सेवाही सुरू केली आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्यासह किरकोळ आजारांसाठी रुग्णालयात जाण्याची गरज पडत नाही.

केंद्र सरकारने आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नाही, तर ऑनलाइन ओपीडी सेवाही सुरू केली आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्यासह किरकोळ आजारांसाठी रुग्णालयात जाण्याची गरज पडत नाही. गेल्या वर्षभरात सर्दी, डोकेदुखीसारख्या आजारांवर ई-संजीवनी योजनेच्या माध्यमातून अनेक रुग्णांनी ऑनलाइन उपचार करून घेतले आहेत.

वातावरणातील बदलामुळे अनेक दुखणे, साथीचे आजार डोके वर काढतात. त्यामुळे डॉक्टरांकडे औषधोपचारासाठी जावे लागते. डॉक्टरांकडे गेल्यावर लागणारा वेळ पाहता अनेकदा रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. वेळ आणि त्रास वाचावा म्हणून केंद्र सरकारच्या वतीने 'ई-संजीवनी' योजना सुरू केली आहे.

इथे करा नोंदणी...- ऑनलाइन ओपीडीसाठी https://esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून किंवा ई-संजीवनी अॅप डाउनलोड करून ऑनलाइन उपचारासाठी वेळ घेता येते.- सकाळी साडेनऊपासून ही ऑनलाइन ओपीडी सेवा सुरू होते. याद्वारे जिल्ह्यात अनेक रुग्णांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे.

काय आहे 'ई-संजीवनी''ई-संजीवनी' ओपीडी नावाचे अॅप आहे. याद्वारे रुग्णांना घरबसल्या डॉक्टरांकडून सल्ला घेता येतो. सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी १:४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत याद्वारे डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो.

नोंदणी कशी कराल?ई-संजीवनी ओपीडी अॅप मोबाइलमध्ये घेतल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर संबंधित डॉक्टरांशी नागरिकांना आपल्याला असलेल्या आजाराबाबत चर्चा करून त्याचे आवश्यक ते मार्गदर्शन संबंधितांकडून मिळते. यानंतर ही प्रिस्क्रिप्शन डाउनलोड करून नागरिकांना औषध-गोळ्या घेता येतात.

टॅग्स :Healthआरोग्य