शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दिलासा! 'या' देशात कोरोनाच्या लसीचे ५० लाख डोस तयार होणार; कधी?, ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 10:14 IST

CoronaVirus News Update: कमी दरातील आणि सुरक्षित लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणात जगभरातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक देशातून परिक्षणाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. क्लिनिकल ट्रायलची प्रक्रिया दीर्घकालीन असल्यामुळे लस तयार होण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार १३ लसींचे सध्या क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.

ब्रिटनच्या ऑक्सनफोर्ड युनिव्हर्सिटीची लस सगळयात पुढे आहे.  भारतातील सीरम इंडीया इंस्टिट्यूट या लसीचे उत्पादन करणार आहे. प्राण्यांवर केलेल्या परिक्षणानंतर लसीचे सकारात्मक परिणाम येऊ शकतात. अशी आशा तज्ज्ञांना आहे. ब्रिटनमध्ये अजून एका कोरोना लसीचे माणसांवर परिक्षण करण्याची  तयारी सुरू आहे. लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये ३०० लोकांवर लसीचे परिक्षण केले जाणार आहे.

प्रोफेसर रॉबिन शटोक हे या ट्रायलचे नेतृत्व करत आहेत. इंपीरियल कॉलेज लंडनमध्ये होत असलेल्या मानवी परिक्षणाआधी प्राण्यांवर या लसीचे ट्रायल यशस्वी झाले आहे. तज्ज्ञांचा दावा आहे की, या लसीमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल. या लसीचे मानवी परिक्षण यशस्वी झाल्यास ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.

इंपीरियल कॉलेज ऑफ लंडनच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस माणसांसाठी किती सुरक्षित आहे. हे पाहिले जाणार आहे. प्रोफेसर रॉबिन शेटॉक यांनी सांगितले की, आम्ही कमी दरातील आणि सुरक्षित लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत. मानवी परिक्षणात सकारात्मक परिणाम दिसून आल्यास  पुढील टप्प्यात ६ हजार लोकांवर परिक्षण केले जाणार आहे. ठरवल्याप्रमाणे लसीचे ट्रायल यशस्वी झाल्यास या वर्षाच्या शेवटापर्यंत लस उपलब्ध होऊ शकते. 

प्रोफेसर शेटॉक यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार  लस तयार करण्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकरकडून जी किंमत मिळाली आहे. त्यातून २५ लाख डोस तयार होऊ शकतात. लसीचे ५० लाख डोस बनवण्यासाठी सांगण्यात आले आहे. सध्या जगभरात १२० पेक्षा जास्त जागांवर कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १३ ठिकाणी परिक्षण सुरू आहेत. या १३ पैकी चीन, अमेरिका,  ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, रुस आणि जर्मनीमध्ये ट्रायल सुरू आहे.

एक 'असा' धातू; ज्याच्या कोटिंगमुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा होतो खात्मा; जाणून घ्या धातूबाबत

CoronaVirus News : श्वासोच्छवासाच्या योग्य पद्धतीने कोरोनावर करता येते मात; नोबेल विजेत्या तज्ज्ञाचा दावा

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स