शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

जे बात! हृदयामध्ये गंभीर बिघाडामुळे आजारी असलेल्या दोन महिन्यांच्या बाळाने कोविड-१९ वर केली मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 16:17 IST

Coronavirus News : महाराष्ट्रातील नंदुरबार येथील श्री. कृष्णा अगरवाल यांच्या एक महिन्याच्या मुलीच्या हृदयात गंभीर बिघाड असल्याने या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते.  

मुंबई: अवघ्या एक महिन्याच्या लहानग्या बाळाने जन्मजात हृदयविकार व कोविड-१९ अशा दोन महाप्रचंड आव्हानांवर यशस्वीपणे मात केल्याची घटना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार येथील श्री. कृष्णा अगरवाल यांच्या एक महिन्याच्या मुलीच्या हृदयात गंभीर बिघाड असल्याने या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते.  बाळाला जेव्हा रुग्णालयात भरती केले तेव्हाच ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचे देखील समजले.  

कोविड संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत कार्डियाक सर्जरीनंतरच्या परिणामांवर विपरीत प्रभाव पडण्याची शक्यता असते, त्यामुळे शस्त्रक्रिया दोन आठवड्यांनंतर करण्यात आली.  दरम्यानच्या काळात कोविड आयसीयूमध्ये त्या मुलीवर कोविडचे उपचार करण्यात आले.  ती कोविडमधून पूर्ण बरी होईस्तोवर तिच्या हृदयाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले गेले व त्याबाबतीत काही गंभीर समस्या उद्भवू नये यासाठी वैद्यकीय उपाययोजना सुरु होत्या.  कोविडच्या दृष्टीने दोन आठवड्यांचा काळ सुरक्षित मानला जातो त्यामुळे दोन आठवड्यांनी कोविडमधून बरी झाल्यानंतर या मुलीला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. अतिशय गुंतागुंतीची ओपन हार्ट करेक्टिव्ह कार्डियाक सर्जरी यशस्वीपणे पार पडली आणि शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या तब्येतीमध्ये वेगाने सुधारणा घडून आली. उपचार, शस्त्रक्रिया यासाठी जवळपास संपूर्ण महिनाभर रुग्णालयात राहिल्यानंतर २५ एप्रिल रोजी त्या मुलीला घरी पाठवण्यात आले.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट, पेडियाट्रिक व कन्जिनेटल हार्ट सर्जन तसेच चिल्ड्रेन्स हार्ट सेंटरचे संचालक डॉ. सुरेश राव यांनी सांगितले, "एक महिन्याच्या त्या मुलीचे वजन हॉस्पिटलमध्ये भरती करतेवेळी फक्त तीन किलो होते. ऑक्सिजन सॅच्युरेशन ८६% इतके कमी होते. या मुलीला जन्मजात हृदयविकार असल्याचे आढळून आले होते, या आजाराला ऑब्स्ट्रॅक्टेड टोटल अनोमलस पल्मनरी वेनस कनेक्शन (टीएपीव्हीसी) असे म्हणतात.  सर्वसामान्यतः फुफ्फुसातून प्राणवायूने परिपूर्ण रक्त हृदयाच्या डाव्या झडपेमध्ये येते आणि तिथून ते संपूर्ण शरीराला पुरवले जाते.  परंतु या बाळाच्या बाबतीत फुफ्फुसाकडून येणाऱ्या रक्तवाहिन्या हृदयाच्या डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला जोडल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नव्हता आणि फुफ्फुसांवर भरपूर ताण येत होता.  मुलीची स्थिती अतिशय गंभीर होती आणि तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते." 

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या कन्सल्टन्ट पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. तनुजा कारंडे यांनी सांगितले, "हृदयाच्या उजव्या बाजूला अतिशय ताण येत असल्यामुळे बाळाची स्थिती खूपच गंभीर झालेली होती, त्यामुळे हृदयाच्या आकुंचन व प्रसरण क्रिया कमजोर पडल्या होत्या.  टीम शस्त्रक्रियेची तयारी करत असताना आरटी-पीसीआर नेजल स्वैबवरून लक्षात आले की, बाळ कोविड पॉझिटिव्ह आहे.  सध्याच्या वैद्यकीय माहितीनुसार कोविड-१९ पॉझिटिव्ह असलेल्या मुलांमध्ये कार्डियाक शस्त्रक्रियेचे परिणाम चांगले होत नाहीत तसेच मृत्यू दर देखील जास्त असल्याचे आढळून आले आहे.  संसर्गजन्य आजार तज्ञ डॉ. तनु सिंघल आणि इतर टीम सदस्यांसोबत विचारविनिमय केल्यानंतर बाळाला कोविड आयुसीयूमध्ये ठेवून त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला."

बाळाला आयसोलेट करण्यात आले, पेडियाट्रिक कार्डियाक इंटेन्सिव्हिस्टसची टीम कोविड आयुसीयूमध्ये तिच्या सर्व महत्त्वाच्या अवयवांचे कार्य नीट चालले आहे अथवा नाही यावर बारकाईने लक्ष ठेवून होती.  कन्सल्टन्ट - पेडियाट्रिक कार्डिओव्हस्क्युलर ऍनेस्थेशिओलॉजी व इंटेन्सिव्हिस्ट डॉ. कमलेश टेलर या टीमचे नेतृत्व करत होते.  २५ मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेल्या या बाळावर कोविड-१९ चे उपचार करण्यात आले, तसेच त्या काळात तिच्या हृदयामध्ये काही गंभीर समस्या होऊ नये यासाठी इतर सहाय्यक वैद्यकीय उपाययोजना देखील सुरु होत्या.  मुलीची आई देखील कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समजले व त्यांना आयसोलेट करण्यात आले.  दरम्यानच्या काळात मुलीच्या तब्येतीमध्ये काही गुंतागुंत किंवा घसरण झाल्यास तातडीने शस्त्रक्रिया करता यावी यासाठी हॉस्पिटलची कार्डियाक टीम सुसज्ज ठेवण्यात आली होती.  परंतु सुदैवाने वैद्यकीय उपाययोजनांमुळे मुलीचे सर्व प्रमुख अवयव स्थिर राहिले व कोविड-१९ च्या दृष्टीने सुरक्षित मानला जाणारा काळ म्हणजे पंधरवडा पूर्ण झाल्यानंतर बाळाला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले.

अतिशय किचकट अशी करेक्टिव्ह ओपन हार्ट सर्जरी करून फुफ्फुसाकडून येणाऱ्या रक्तवाहिन्या हृदयाच्या डाव्या झडपेशी जोडण्यात आल्या.  बराच काळ चाललेल्या या शस्त्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत बाळाने खूप छान प्रतिसाद दिला आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील तिची तब्येत लगेचच सुधारली.

महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये मुलांमध्ये नॉवेल कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या चिल्ड्रेन्स हार्ट सेंटरमधील डॉक्टरांकडे अशा अनेक केसेस येत आहेत.  याच टीमने अशाच प्रकारच्या आणखी दोन कोविड पॉझिटिव्ह बाळांवर उपचार करण्यात यश मिळवले आहे.  अवघ्या दोन महिन्यांच्या एका बाळाच्या बाबतीत टीएपीव्हीसीचा गंभीर हृदयविकार होता तर दुसऱ्या केसमध्ये एका बारा वर्षाच्या मुलीच्या हृदयात ट्युमर होता.  या दोन्ही मुलांवर कोविड आयसीयूमध्ये उपचार करत असताना त्यांच्यावर बारकाईने लक्ष देखील ठेवले गेले. त्यानंतर पेडियाट्रिक कार्डियाक आयसीयूमध्ये यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.  शस्त्रक्रियेनंतर या सर्व मुलांच्या तब्येती सुधारल्या व त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

बाळाचे वडील श्री. कृष्णा अगरवाल यांनी सांगितले, "आमची मुलगी खूप आजारी होती त्यामुळे आम्ही सर्वजण खूप काळजीत होतो. आम्ही महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये राहतो, तिथल्या सर्वात जवळच्या सुरत हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेलो. कोविड महामारीच्या काळात मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये बाळाला भरती करणे हा माझ्या बाळासाठी सर्वोत्तम निर्णय ठरला.  डॉ. राव आणि त्यांच्या टीमने माझ्या मुलीची इतकी काळजी घेतली, तिचे प्राण वाचवले याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहीन."     

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPositive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीHealthआरोग्यMumbaiमुंबई