शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एनर्जी ड्रिंक्समुळे याच्या जिभेची झाली ही हालत, दिवसाला घेत होता ५ ते ६ ड्रिंक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 13:27 IST

जगभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण एनर्जी ड्रिंकचं सेवन करतात. पण डॅन रॉयल्स नावाच्या व्यक्तीसाठी हे एखाद्या भयावह स्वप्नासारखंच ठरलं.

(Image Credit : dailymail.co.uk)

जगभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण एनर्जी ड्रिंकचं सेवन करतात. पण डॅन रॉयल्स नावाच्या व्यक्तीसाठी हे एखाद्या भयानक स्वप्नासारखंच ठरलं. डॅन हा शिक्षक आहे. त्याने नुकताच एक फोटो सोशल मीडियात शेअर केला असून त्यात त्याच्या जिभेवर जखमा दिसत आहेत. असे वाटत आहे की, त्याच्या जिभेची वरची त्वचा पूर्णपणे सोलली गेली आहे. डॅनने दावा केला आहे की, तो दिवसातून  ५ ते ६ एनर्जी ड्रिंक सेवन करत होता आणि त्यामुळेच हे झालंय.

डॅनने फोटो शेअर करत त्याच्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे आणि इतरांनाही त्याने इशारा दिला आहे. डॅनने सांगितले की, तो दररोज ५ ते ६ एनर्जी ड्रिंक सेवन करत होता. त्यानंतर त्याच्या जिभेची ही अवस्था झाली. तेव्हा तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांनी त्याला सांगितले की, एनर्जी ड्रिंकमध्ये आढळणारे केमिकल्स आणि शुगरचं अधिक प्रमाण यामुळे हे झालंय. एनर्जी ड्रिंकच्या प्रत्येक कॅनमध्ये ५८ ग्रॅमपर्यंत शुगरचं प्रमाण असतं. त्यासोबतच अमिनो अ‍ॅसिड, व्हिटॅमिन-बी आणि हर्बल पदार्थ असतात. 

त्याच्यासोबत घडलेली घटना सांगतच त्यांने एनर्जी ड्रिंक सेवन करणाऱ्या लोकांनाही ते सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. डॅन रॉयल्स हा मुळचा ऑस्ट्रेलियन आहे. पण तो आशियामध्ये राहतो. त्याने हेही सांगितलं की, तो धुम्रपान करतो. मात्र डॉक्टरांचं हे स्पष्ट म्हणणं आहे की, जिभेला झालेल्या जखमा या एनर्जी ड्रिंकमुळे झाल्या आहेत. 

डॉक्टर आणि डेन्टिस्टनी आधीही एनर्जी ड्रिंकबाबत इशारा दिला आहे. कारण या ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणाच कॅफीन आणि शुगर असते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात शुगरचं प्रमाण अधिक असलेल्या ड्रिंक्समुळे दातांची समस्या अधिक वाढत आहे. त्यासोबतच कॅफीनच्या ओव्हर डोजमुळे पॅल्पिटेशन, हाय ब्लड प्रेशर, मळमळ, उलटी या समस्या होतात. तर काही केसेसमध्ये काही लोकांचा मृत्यूही होतो.

टॅग्स :Healthआरोग्यJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल