शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

रोज सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्याआधी अनुष्का शर्मा करते 'हे' काम, चाहत्यांना सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 11:42 IST

अनुष्का सकाळी उठल्यानंतर ब्रश करत नाही तर त्याआधी एक महत्त्वाचं काम करते. तिने आपल्या सोशल मीडियावर याची माहितीही दिली आहे. तिने आपलं रूटिन चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. अनुष्काच्या दिवसाची सुरुवात होते ती ऑईल पुलिंगने (Oil Pulling).

सकाळी उठल्यानंतर सामान्यपणे आपण सर्वजण ब्रश करतो. पण काहींची दिनचर्या थोडी वेगळी असते. अशाच वेगळ्या पद्धतीने दिवसाची सुरुवात करते ती अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma). अनुष्का सकाळी उठल्यानंतर ब्रश करत नाही तर त्याआधी एक महत्त्वाचं काम करते. तिने आपल्या सोशल मीडियावर याची माहितीही दिली आहे. तिने आपलं रूटिन चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. अनुष्काच्या दिवसाची सुरुवात होते ती ऑईल पुलिंगने (Oil Pulling).

उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी चांगल्या सवयीचा आपल्या आयुष्यात समावेश असणं गरजेचं असतं. यासाठी आरोग्य तज्ज्ञ (Holistic Wellness Experts) अनेक सल्ले देतात. यामध्ये आपली जी सकाळची दिनचर्या असते, त्याबद्दलही काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. जसं की, नाश्त्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स (Complex Carbohydrates) आणि प्रथिनांचा (Proteins) समावेश करणं, लवकर जेवणंणं, थंड पाण्याने आंघोळ करणं, योगासनं करणं इत्यादी. अनेक सेलेब्रिटीदेखील त्यांच्या चाहत्यांना निरोगी जीवनशैली जगण्यास प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचं रूटीन शेअर करतात. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) दिनचर्येचा भाग आहे ते ऑईल पुलिंग म्हणजे तेलाच्या गुळण्या. आयुर्वेदात त्याला गंडूश असं म्हणतात. गंडूश केवळ तोंडाच्या किंवा दातांच्या स्वच्छतेसाठीच (Dental Hygiene) नव्हे, तर संपूर्ण आरोग्यासाठीदेखील (General Health) चांगलं असतं.

अनुष्काने तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. तेलाच्या गुळण्या, त्याचे आयुर्वेदिक औषधी महत्त्व, तेलाच्या गुळण्या करण्याची प्रक्रिया आणि त्याचे आरोग्याला असलेले फायदे याबद्दलही तिने माहिती दिली आहे. या फोटोत तिचा लाडका कुत्राही दिसत आहे. अनुष्काने फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "माझ्या स्वीट-स्मूश-डॉग्गो ड्यूडच्या सहवासात Oil Pulling करण्याचं माझं सकाळचं रुटीन असतं! ही एक प्राचीन आयुर्वेदिक गोष्ट आहे. ती 'कवल' (Kavala) किंवा 'गंडूश' (Gundusha) म्हणून ओळखली जाते. हे दात निरोगी ठेवण्याचं एक तंत्र आहे. त्यामध्ये सकाळी रिकाम्या पोटी काही मिनिटं थोडंसं तेल तोंडात धरून त्याच्या गुळण्या केल्या जातात आणि नंतर ते तेल थुंकून टाकलं जातं"

या प्राचीन प्रक्रियेच्या फायद्यांबद्दल अनुष्काने अधिक माहिती दिली. "ही प्रक्रिया दातांची स्वच्छता आणि आरोग्यासाठी उत्तम आहे. यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात. सध्या आपण सर्व जण या वेळेचा उपयोग आपल्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी आणि आपली रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी करत आहोत. त्यामुळे मी हे शेअर करण्याचा विचार केला आहे. तुम्हा सर्वांनाही ते फायदेशीर ठरेल, अशी आशा आहे"

गंडूश म्हणजे काय?ही आयुर्वेदात सांगितलेली एक प्राचीन क्रिया आहे. मौखिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी रिकाम्या पोटी ही क्रिया केली जाते. सकाळी उठल्या उठल्या १०-१५ मिनिटं तेल तोंडात धरून ठेवणं आणि नंतर थुंकून टाकणं, अशा प्रकारे ही क्रिया केली जाते. ही क्रिया दात घासण्यापूर्वी करायची असते.

या प्रक्रियेसाठी वापरले जाणारे तेलाचे प्रकार

  • खोबरेल तेल (Coconut Oil)
  • तिळाचे तेल (Sesame Oil)
  • सूर्यफूल तेल (Sunflower Oil)
  • ऑलिव्ह तेल (Olive Oil)

ही क्रिया करताना काय काळजी घ्यावी?

  • ही प्रक्रिया केवळ खाद्यतेल वापरून केली गेली पाहिजे.
  • रिकाम्या पोटी एक चमचा तेल घ्या आणि फेस येईपर्यंत १० ते १५ मिनिटं तोंडात खुळखुळवा. (म्हणजे आपण चूळ भरताना पाणी खुळखुळवतो, तसंच)
  • तेल गिळू नका आणि जरी ते चुकून पोटात गेलंच तरी काळजी करू नका.
  • तोंडातलं तेल फेसाळल्यानंतर ते थुंकून टाका.
  • यानंतर तोंड स्वच्छ धुवा आणि टूथपेस्टने दात व्यवस्थित स्वच्छ करा.

 

काय आहेत याचे फायदे ?

  • ही प्रक्रिया नियमित केल्याने दात शुभ्र होतात.
  • दातांच्या दुर्गंधीवर हा उत्तम उपाय आहे.
  • दातातल्या पोकळीला प्रतिबंध होतो.
  • हिरड्यांमध्ये होणारी जळजळ कमी होते.
  • मायग्रेन, तणाव, दमा आदींच्या लक्षणांवर ही प्रक्रिया उपयुक्त ठरते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सAnushka Sharmaअनुष्का शर्मा