शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आता केवळ ‘बीएमआय’वर लठ्ठपणा ठरवता येणार नाही; जाणून घ्या नवीन मार्गदर्शक तत्त्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 10:20 IST

आजपर्यंत देशात एखाद्या व्यक्तीची लठ्ठपणाची व्याख्या ही त्याच्या ‘बीएमआय’वर (उंची आणि वजनाचं गुणोत्तर) ठरत होती.

मुंबई : आजपर्यंत देशात एखाद्या व्यक्तीची लठ्ठपणाची व्याख्या ही त्याच्या ‘बीएमआय’वर (उंची आणि वजनाचं गुणोत्तर) ठरत होती. त्याच्या आधारावरच लठ्ठपणावर उपचार दिले जायचे. मात्र, जगभरातील लठ्ठपणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करून विविध शाखेच्या डॉक्टरांनी लठ्ठपणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करून त्यावरील  शोधनिबंध वैद्यकीय विश्वातील प्रतिष्ठेच्या जर्नल असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियामध्ये नुकताच प्रसिद्ध केला आहे. 

 लठ्ठपणा केवळ ‘बीएमआय’वर आधारित नसल्याचे नमूद केले आहे. तसेच नवीन मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस करण्यात आली आहे. थोडक्यात लठ्ठपणामुळे होणारे आजार आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम याचा विचार करण्यात येणार आहे.

  हा शोधनिबंध तयार करण्याकरिता डायबेटॉलॉजिस्ट, एंडोक्रायनोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, बॅरियाट्रिक सर्जन आणि गायनॅकॉलॉजिस्ट तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. 

  २० ते ६९ वर्षे वयोगटातील भारतीय प्रौढांमध्ये २०२४ पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

हा शोधनिबंध लिहिणाऱ्यांपैकी बॅरियाट्रिक सर्जन डॉ. शशांक शहा यांनी सांगितले की, ‘हा शोधनिबंध तयार करण्यासाठी  या देशातील व्यक्तींचा अभ्यास करण्यासोबत आम्ही जगभरातील लठ्ठपणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास केला. त्यानुसार केवळ लठ्ठपणाच्या उपचारासाठी बीएमआय हा आधार ठरू शकत नाही.  अनेकवेळा काही व्यक्तींना ज्या विविध आजारांना सामोरे जावे लागते, त्याचे मूळ कारण हे लठ्ठपणा असतो. तर त्या व्यक्तीला लठ्ठपणावर तत्काळ उपचार केले पाहिजे. त्यावेळी त्या व्यक्तीचा बीएमआय बघता कामा नये. थोडक्यात लठ्ठपणामुळे होणारे आजार आणि त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम याचा विचार करण्यात येणार आहे.’ 

बीएमआय  म्हणजे काय? 

  आपल्या शरीरातील वजन नियंत्रणात आहे की नाही, यासाठी  बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) मोजला जात. यामध्ये शरीराची उंची आणि वजनाचं गुणोत्तर याला बीएमआय मोजणे, असे म्हणतात. 

  बीएमआयमुळे शरीराचं वजन तुमच्या उंचीच्या तुलनेत बरोबर आहे की नाही, याची आपल्याला माहिती मिळते. विशेष म्हणजे, आपल्या दिशा मिळते.  

  सर्व साधारणपणे १८.५ ते २४.५च्या दरम्यान बीएमआय असावा. त्यापेक्षा २५ पेक्षा अधिक असेल तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच जर बीएमआय ३० पेक्षा अधिक असेल तर लठ्ठपणाची सुरुवात आहे. त्यांनी त्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स