शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवडे रोज नारळ पाणी किंवा लिंबू पाणी प्यायल्याने काय होतं? न्यूट्रिशनिस्टने सांगितले फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 11:12 IST

Healthy Drinks: शरीर हायड्रेट राहिलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. याने वजन कमी करण्यास मदत मिळते आणि रक्तप्रवाह कमी करण्यास मदत मिळते. 

Healthy Drinks: आरोग्य चांगलं ठेवण्याचा विषय येतो तेव्हा जास्तीत जास्त लोक पौष्टिक आहार घेण्यावर भर देतात. आहारात पालेभाज्या, फळं आणि कडधान्यांचा समावेश केला जातो. तसेच काही हेल्दी ड्रिंक्सही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या ड्रिंक्सने शरीराला आवश्यक हायड्रेशन मिळतं. शरीर हायड्रेट राहिलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. याने वजन कमी करण्यास मदत मिळते आणि रक्तप्रवाह सुरळीत करण्यास मदत मिळते. 

न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी अशाच काही हेल्दी ड्रिंक्सबाबत माहिती दिली आहे. ज्यांचं रोज सेवन  केल्याने आरोग्यावर कमालीचे फायदे दिसू लागतात. या ड्रिंक्समध्ये नारळ पाणी, लिंबू पाणी आणि आल्याच्या रसाचा समावेश आहे. हे ड्रिंक्स रोज प्यायल्याने शरीराला काय फायदे मिळतात हेच आज आपण बघणार आहोत.

रोज हेल्दी ड्रिंक्स पिण्याचे फायदे

न्यूट्रिशनिस्टनी सांगितलं की, जर तुम्ही रोज दोन आठवडे नारळ प्याल तर याने बेली फॅट बर्न होईल आणि ब्लोटिंगची समस्या दूर होईल. जर तुम्ही रोज 2 आठवडे लिंबू पाणी प्याल याने ब्लड सर्कुलेशन चांगलं होईल आणि सोबतच मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यासही मदत मिळेल.

रोज सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा रस सेवन कराल तर याने त्वचा चांगली होण्यास मदत मिळेल आणि सोबतच चेहऱ्यावर पुरळ किंवा सुरकुत्या दिसणार नाहीत.

ऑईल पुलिंगचे फायदे

दातांवर ऑईल पुलिंग केल्यानेही अनेक फायदे मिळतात. न्यूट्रिशनिस्टनी सांगितलं की, रोज ऑईल पुलिंग केल्याने इम्यूनिट वाढते, मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि तुम्हाला आधीपेक्षा जास्त एनर्जेटिक वाटत. तसेच याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि दातांना किडही लागत नाही.

ऑईल पुलिंग करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करू शकता. तोंडात 1 ते 2 चमचे खोबऱ्याचं तेल ठेवून ते तोंडात फिरवा. 2 ते 3 मिनिटे ऑईल पुलिंग केल्याने दातांची चांगली स्वच्छता होते. ऑईल पुलिंगमुळे दातांच्या अनेक समस्या दूर होतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य