शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चपाती आणि भात एकत्र खावा की नाही? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 17:03 IST

अनेकांना असा प्रश्न पडतो की, भात आणि चपाती एकत्र खाणं योग्य आहे की अयोग्य?

चपाती आणि भात भारतीय लोकांच्या रोजच्या जेवणातील महत्वाचा भाग आहेत.आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भात आणि चपाती किती महत्वाच्या आहेत हेही तुम्हाला माहीत आहे. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, भात आणि चपाती एकत्र खाणं योग्य आहे की अयोग्य? तर डाएट एक्सपर्ट्स सांगतात की, भात आणि चपाती एकत्र खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही.

भात-चपाती एकत्र खावी की नाही?

एक्सपर्ट्सनुसार, भात-चपाती एकत्र का खाऊ नये. कारण याचा थेट संबंध कॅलरी काऊंटशी जोडला जातो. जेव्हा भात आणि चपाती एकत्र खाण्यात येते तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरी इनटेक करत असता आणि जास्त कॅलरी असलेला आहार घेतल्यावर पचन तंत्रांवर अधिक दबाव पडतो.

भात आणि चपाती एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमजोर होते. तसेच शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि यामुळे लठ्ठपणाची समस्या होते. काही रिसर्चमधूनही समोर आली आहे की, भात आणि चपाती जेव्हाही खायची असेल तर दोन्हीपैकी एकच एकावेळी खावं.

रात्रीच्या जेवणात काय असावं?

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांना नेहमीच प्रश्न पडतो की, रात्रीच्या जेवणात काय खावं?  याचं उत्तर सोपं आहे. रात्री जेवण हे नेहमी पचायला हलकं असंच करावं.

डाएट एक्सपर्ट्सही हेच सांगतात की, भाताच्या तुलनेत चपती पचायला हलकी आहे. जर तुम्ही रात्री चपाती खात असाल तर ती सहज पचते. पण जर रात्री तुम्ही भात खात असाल तर तुम्हाला चांगली झोप येणार नाही. चांगली झोप न येणे आणि पचनक्रिया विस्कळीत होणे, यामुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो.

रात्री भात का खाऊ नये?

भात खाल्ल्याने अनेकांचं पोट फुगतं. Water retention ची समस्या असलेल्या लोकांनी तर अजिबात भात खाऊ नये असे सांगितले जाते. कारण भात खाल्ल्याने त्यांना अधिक समस्या होऊ शकते. तसेच त्यांना भात पचण्यासही अधिक वेळ लागतो. अनेकांना भाताची अ‍ॅलर्जी असते. डायबिटीसच्या रूग्णांनी भात खाऊ नये असे सांगितले जाते. तसेच अस्थमा असलेल्या लोकांनी सुद्धा भात खाऊ नये. याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य