शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

CoronaVirus: व्हायग्रामुळे वाचले कोमात गेलेल्या नर्सचे प्राण; कोरोनाची झालेली लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 11:21 IST

CoronaVirus vigra treatment: मोनिकाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिने डॉक्टर आणि तिच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. मोनिकाला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी इरेक्टाईल डिसफंक्शनच्या औषधाचा वापर केला.

कोरोनामुळे कोमामध्ये गेलेल्या एका नर्सला व्हायग्राच्या वापराने वाचविण्यात यश आले आहे. ३७ वर्षीय मोनिका अल्मेडा गेल्या ४५ दिवसांपासून कोमामध्ये होती. डॉक्टरांनी तिला व्हायग्राच्या मदतीने कोमातून बाहेर काढले. ही आयडिया मोनिकाच्या सहकाऱ्यांची होती. द सनमध्ये छापून आलेल्या एका वृत्तामध्ये या उपचाराबद्दल सांगितले आहे. मोनिकाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिने डॉक्टर आणि तिच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. मोनिकाला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी इरेक्टाईल डिसफंक्शनच्या औषधाचा वापर केला. 

मोनिकाची ऑक्सिजन लेव्हल निम्म्यापेक्षाही कमी झाली होती. तिची ऑक्सिजन लेव्हल सतत कमी होत होती. इंग्लंडच्या गेन्सबरो लिंकनशायरमध्ये राहणाऱ्या मोनिकाने सांगितले की, जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला डॉक्टरने सांगितले की, तुला व्हायग्राच्या मदतीने शुद्धीवर आणण्यात आले आहे. सुरुवातीला मला हे मस्करी वाटली. परंतू, मला त्यांनी व्हायग्राची जास्त मात्रा देण्यात आल्याचे सांगितले.

मोनिका ही एनएचएस लिंकनशायरमध्ये कोरोनाच्या रुग्णांची सेवा करत होती. याचवेळी तिला ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लागण झाली. हळू हळू तिची तब्येत बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिला तेथून डिस्चार्जही देण्यात आला. 

मात्र घरी गेल्यावर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे तिला पुन्हा लिंकन काऊंटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. उपचारावेळी ती १६ नोव्हेंबरला कोमात गेली. व्हायग्रामुळे रक्ताचे परिचलन चांगले सुरु राहते. तसेच फुफ्फुसामध्ये  फोस्पोडायस्टेरियस एंजाइम बनविते, यामुळे रक्तवाहिन्या विस्फारतात आणि फुफ्फसाला आराम मिळतो. व्हायग्राचा डोस दिसल्यावर ४८ तासांत फरक दिसू लागला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या