शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

हार्टलाच नव्हे, ब्रेनलाही येतोय अटॅक, लक्षणांकडे दुर्लक्ष नको; संतुलित आहार आणि व्यायाम हवा!

By संतोष हिरेमठ | Updated: October 29, 2023 12:54 IST

आज, २९ ऑक्टोबरला ‘जागतिक पक्षाघात दिन’ पाळला जातो

संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: अटॅक म्हटले तर हार्ट अटॅकच अनेकांना माहीत आहे. मात्र,  ज्याप्रमाणे हृदयाला झटका येतो, तसाच ब्रेनला म्हणजे मेंदूलाही झटका येतो. वैद्यकीय भाषेत याला ‘सिरेब्राे व्हस्क्युलर ॲक्सिडेंट’ म्हणजे पक्षाघात असे म्हटले जाते. एकट्या ‘घाटी’त महिन्याला पक्षाघाताचे १०० च्या घरात, तर मेंदूत रक्तस्रावाचे जवळपास  ४० रुग्ण येतात. याबद्दल जनजागृतीसाठी दरवर्षी जगभरात २९ ऑक्टोबरला ‘जागतिक पक्षाघात दिन’ पाळला जातो.

पक्षाघाताची लक्षणे काय?

  • काही वेळा हात, पाय लुळा पडण्याचा प्रकार होतो. 
  • चेहरा एका बाजूला पडणे, हेदेखील पक्षाघाताचेच एक लक्षण आहे.  बाेलताना जीभ अडखळणे, बोलता न येणे हेही पक्षाघाताचे लक्षण आहे.
  • शरीराचा अचानक तोल जाणे, संतुलन हरवणे हेही एक लक्षण सांगितले जाते.

(जागतिक पक्षाघात दिन)

३० टक्के रुग्णांचा आजार आपोआप बरा३० टक्के रुग्णांचा आजार हा आपोआपच बरा होत असतो. पक्षाघाताच्या रुग्णासाठी ३ तास ४० मिनिटे हा ‘गोल्डन अवर’ मानला जातो. यादरम्यान उपचार घेतल्यास तो बरा होऊ शकतो.- डाॅ. जीवन राजपूत, मेंदूविकारतज्ज्ञ

आजार टाळू शकतो

पक्षाघात टाळता येऊ शकतो. त्यासाठी संतुलित आहार व व्यायाम महत्त्वाचा आहे. -  डॉ. मकरंद कांजाळकर, न्यूरोफिजिशियन

९० टक्के रुग्ण होऊ शकतात बरे

चारपैकी एकाला स्ट्रोकचा धोका असतो. योग्य काळजी, खबरदारी घेतली, वेळीच योग्य उपचार घेतला तर ९० टक्के रुग्ण बरे होऊ शकतात. - डाॅ. पांडुरंग वट्टमवार, पक्षाघाततज्ज्ञ

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स