शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Newborn twins gets covid19 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; नवजात जुळ्या चिमुकल्यांना कोरोनानं बनवलं शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 15:46 IST

Newborn twins gets covid19 : तपासणी दरम्यान ही नवजात मुलं कोविड -१९ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अलीकडेच गुजरातमधील वडोदरा येथून नवजात शिशुंना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. येथे कोरोना विषाणूची लागण होण्याच्या काही दिवस आधीच दोन जुळ्या मुलांनी जगात प्रवेश केला होता. सध्या या दोन्ही चिमुकल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे. इतर राज्यातून गुजरातमध्ये कोरोनाचा प्रवेश होऊ नये म्हणून सरकारने गुरुवारपासून आरटी-पीसीआर चाचणी आवश्यक केली आहे.

वडोदरामध्ये नवजात जुळे मुलं कोविड -१९ ची बळी ठरली आहेत. वडोदराच्या एसएसजी हॉस्पिटलमधील बालरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शील अय्यर यांच्या म्हणण्यानुसार, नवजात मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मुलांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान ही नवजात मुलं कोविड -१९ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

गुरुवारी डॉक्टर म्हणाले की, ''अतिसार आणि डिहाड्रेशनमुळे मुलांना रुग्णालयातून सोडल्यानंतर 15 दिवसांनी परत आणले गेले. आम्ही सुरुवातीला संसर्ग होण्याच्या सर्व सामान्य शक्यतांकडे लक्ष दिले, परंतु नंतर आम्ही त्यांना कोविडची तपासणी केली, ज्यामध्ये त्यांचा अहवाल सकारात्मक आला. मुलांच्या पालकांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे त्यांनी कळवले आहे . आता त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.'' वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला

Www.covid19india.org च्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 3 लाख 10 हजार 108 रुग्ण संक्रमणाची नोंद झाली आहे. त्यापैकी 4 हजार 528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या 12 हजार 996 आहे. त्याचबरोबर 2 लाख 92 हजार 584 रूग्ण निरोगी झाल्यानंतर घरी परतले आहेत. त्याच वेळी, देशभरात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये पुन्हा एकदा गती मिळाली आहे. आतापर्यंत देशात 1 कोटी 23 लाख 2 हजार 118 रुग्ण आढळले आहेत. या सगळ्यात सरकारने लसीकरणाची मोहिम वेगानं सुरू ठेवली आहे. पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यGujaratगुजरातHealth Tipsहेल्थ टिप्स