शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

डेल्टासारखे नवे प्रकार संपूर्ण जगासाठी घातक, जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 14:11 IST

"ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी आहे तिथे रुग्णालये बाधितांनी भरली आहेत. डेल्टामध्ये सतत उत्परिवर्तन होत असून तो पूर्वीच्या विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरतो."

वॉशिंग्टन : कोरोनाचे डेल्टासारखे नवे प्रकार अतिशय घातक आहे. त्यामुळे सारे जग धोकादायक स्थितीतून जात आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी दिला आहे. ९८ देशांत डेल्टाचे अस्तित्व आढळले आहे. (New types like Delta are dangerous for the whole world, the World Health Organization warned)ते म्हणाले की, ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी आहे तिथे रुग्णालये बाधितांनी भरली आहेत. डेल्टामध्ये सतत उत्परिवर्तन होत असून तो पूर्वीच्या विषाणूंपेक्षा अधिक वेगाने पसरतो. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करून सगळ्यांनी कोरोना साथीचा मुकाबला केला पाहिजे.

अत्यंत वेगाने पसरणारा- डेल्टा विषाणू पहिल्यांदा भारतात आढळला. नंतर तो इतरत्र पसरला. - इतर प्रकारांवर मात करून डेल्टा विषाणू कोणत्याही भागात अतिशय वेगाने पसरतो. त्याच्यामुळेच या साथीची देशात दुसरी लाट आली.  बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भीषण होती. - जगात काही महिन्यांत डेल्टा विषाणू अन्य कोरोना विषाणूंना वरचढ ठरेल असेही जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक अधनोम घेब्रिसस यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना