(Image Credit : Drug Target Review)
कॅन्सरच्या म्हणजेच कर्करोगाच्या रूग्णांना एक नवी आशा देण्याच्या उद्देशाने वैज्ञानिकांनी एक नवा उपाय शोधून काढला आहे. यात शरीरातील काही कॅन्सरचे सेल्स(पेशी) स्वत:च स्वत:चा नायनाट करून नष्ट होतील. तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की आपल्या शरीरातील लाखो सेल्स आपला घातक सेल्सपासून बचाव करण्यासाठी स्वत: नष्ट होतात. तेच दुसरीकडे कॅन्सर सेल्स असे असतात, जे आपल्या इम्यून सिस्टीमकडे दुर्लक्ष करून स्वत:ला जिवंत ठेवण्याचा मार्ग शोधतात.
जास्त प्रोटीन उत्पादनामुळे स्वत:च मरतात कॅन्सर सेल्स
वैज्ञानिकांच्या टीमने एका नव्या मार्गाचा शोध लावला आहे. जो एमवायसी नावाच्या जीनसोबत पार्टनरशिप करेल आणि हा नॉर्मल सेलच्या ग्रोथला कंट्रोल करतो. पण जेव्हा हा कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊन वाढू लागतो, तेव्हा एक चेन रिअॅक्शन करतो. ज्याने कॅन्सर ट्यूमर वेगाने वाढू लागतो आणि याला कंट्रोल करणे कठीण होऊन बसतं.
वैज्ञानिकांद्वारे शोधण्यात आलेल्या पाथवे म्हणजे मार्गाला एटीएफ-४ असं नाव देण्यात आलं आहे. ज्यात प्रोटीन आहे आणि जेव्हा हा मार्ग ब्लॉक केला जातो तेव्हा कॅन्सरचे सेल्स प्रमाणापेक्षा अधिक प्रोटीनची निर्मिती करू लागतात आणि स्वत:च मरतात.
कॅन्सर सेल्सला जगण्याची संधी राहू नये म्हणून....
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्राध्यापक कॉनस्टेंटिनोज कोमेनिस म्हणाले की, 'आम्हाला यातून हे कळालं की, आपण आणखी खोलवर अभ्यास करण्याची गरज आहे. जेणेकरून ट्यूमरची ग्रोथ अशाप्रकारे रोखली जाऊ शकेल की, सेल्स जिवंत राहू नये. हा रिसर्च आम्ही टार्गेटची ओळख करण्यासाठी केला आहे. रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, मुख्य उद्देश एटीएफ-४ ला टार्गेट करणे. कारण हा तोच पॉइंट आहे, जिथे दोन्ही सिग्नल मार्ग येऊन मिळतात. याचा अर्थ आहे की, कॅन्सरला सर्व्हाइव करण्याची संधीच मिळू नये'.