शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांच्या बेजबाबदारपणामुळे बाळाला गर्भातच लागू शकते नशेची सवय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 11:13 IST

गर्भावस्थेत धुम्रपान केल्याने बाळाच्या आरोग्याचं गंभीर नुकसान होतं. नुकत्यात करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, हे नुकसान केवळ शारीरिकच नाही तर मानसिकही अशू शकतं.

(Image Credit :independent.ie)

गर्भावस्थेत धुम्रपान केल्याने बाळाच्या आरोग्याचं गंभीर नुकसान होतं. नुकत्यात करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, हे नुकसान केवळ शारीरिकच नाही तर मानसिकही अशू शकतं. अशात लहान मुलांना सिगारेट आणि नशेची सवयही लागण्याची शक्यता असते. फिनलॅंडमध्ये करण्यात आलेल्या एका शोधानुसार ही बाब समोर आली आहे की, गर्भावस्थेदरम्यान धुम्रपान केल्याने नवजात बाळाच्या मेंदूवर वाईट प्रभाव पडतो. हा प्रभाव लहान मुलं मोठी झाल्यावर बघायला मिळतात. अशी लहान मुलं पुढे जाऊन ड्रग्सची नशा करण्याची शक्यता अधिक वाढते. 

जास्त सिगारेटचा धोका

तुर्कू युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे मिकाएल एक्ब्लाद यांच्याद्वारे करण्यात आलेला रिसर्च अमेरिकन जर्नल ऑफ एपीडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. या रिसर्चसाठी १९८७ ते १८८९ दरम्यान जन्माला आलेल्या बाळांची आकडेवारी एकत्र करण्यात आली होती. या मुलांच्या आईंना विचारण्यात आले की, त्या गर्भावस्थेत सिगारेट सेवन करत होत्या का? त्यानंतर ही आकडेवारी १९९४ ते २००७ दरम्यान देण्यात आलेल्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शन रेकॉर्डसोबत जुळवण्यात आलं. यादरम्यान या मुलांचं वय पाच ते वीस वर्ष इतकं होतं. 

या रिसर्चमधून असं आढळलं की, ११ पैकी एका मुलाला मानसोपचार तज्ज्ञांकडून औषध देण्यात आलं. हे औषध कोणत्या ना कोणत्या भीतीमुळे किंवा तणावामुळे देण्यात आलं होतं. या अॅंटीडिप्रेसेंट्स औषधांमध्ये अनेक रसायने असेही असतात, ज्यांचा वापर नशेसाठी केला जातो. यात असं आढळलं की, मुलांना या नशेची सवय लागू शकते. एकूण मुलांमध्ये १४ टक्के असे होते, ज्यांच्या मातांनी गर्भावस्थेत दर दिवशी दहापेक्षा अधिक सिगारेट ओढल्या. तर ११ टक्के मातांनी दहापेक्षा कमी आणि ८ टक्के मातांना सिगारेट ओढली नाही. 

सिगारेटने डिप्रेशन

अजूनही याबाबत माहिती मिळू शकली नाही की, सिगारेट ओढल्याने लहान मुलांच्या मानसिक विकासावर वाईट परिणाम होण्याचं मुख्य कारण काय आहे. असे मानले जात आहे की, कदाचित सिगारेटमध्ये असलेलं निकोटीन बाळाच्या मेंदूसाठी घातक असतं. असेही म्हटले जात आहे की, सिगारेट ओढल्याने मातेच्या शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिजन जात नाही आणि कमी ऑक्सिजनमुळे बाळाचा मेंदू योग्य प्रकारे विकसित होऊ शकत नाही. 

न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये यावर करण्यात आलेल्या एका शोधात मायकल वायत्समन सांगतात की, 'सिगारेटचं डिप्रेशनसोबतही देणं-घेणं आहे. याआधीही अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लोक निराश असल्यावर सिगारेट ओढतात. पण सिगारेटमुळे डिप्रेशन कमी नाही तर अधिक वाढतं. मात्र पोटातील बाळांवर याचा परिणाम होतो हे पहिल्यांदाच समोर आलं आहे. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सParenting Tipsपालकत्व