राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा प्रारंभ
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:54+5:302015-02-14T23:51:54+5:30
अडगाव बु. : स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथे गुरुवारी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा प्रारंभ
अ गाव बु. : स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथे गुरुवारी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य गोपाल कोल्हे तर प्रमुख उपस्थिती पं. स. सदस्य गुलाबसिंग डाबेराव, सरपंच अशोक घाटे, श्रीधर बहाकर, प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मानकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय बहाळ, आरोग्य सेविका खवले, पळसकर व मुख्याध्यापक किशोर कोल्हे यांची होती. कार्यक्रमात ६ ते १४ वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. जंतनाशक मोहीम राबविण्याच्या कामी आरोग्य केंद्राचे कर्मचारी तथा राजेश कुलट, राजेश रंदे, माया कराळे, ज्योती केदार, जयश्री लाटे, नालिंदे, भोयर यांचे सहकार्य लाभले. यानंतर अंगणवाडी केंद्रात सदर मोहीम आयोजित करण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस हजर होत्या. (वार्ताहर)फोटो : १२एकेटीपी१६.जेपीजी..................