शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात अनेक समस्या दूर करतो मोसंबीचा ज्यूस, फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 11:13 IST

या दिवसांमध्ये नियमितपणे मोसंबीचा ज्यूस सेवन कराल तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतील.

उन्हाळा आता सुरू होत आहे. त्यामुळे लोकांना गरमीची समस्या होईल. अशात वातावरण बदलामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. यातीलच एक बेस्ट उपाय म्हणजे मोसंबीचा ज्यूस. या दिवसांमध्ये नियमितपणे मोसंबीचा ज्यूस सेवन कराल तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतील.

1) मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे.

2) मोसंबी सौंदर्यवर्धक आहे. मोसंबी पौष्टिक, मधुर, स्वादिष्ट, रुचकर, पाचक, दीपक, हृदयास उत्तेजना देणारी, धातुवर्धक आणि रक्तसुधारक आहे.

3) सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी, अन्नपदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात.

4)मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो. 

5) मोसंबीची ताजी साल चेहर्‍यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबाची सालही वातहारक असते.

6) पचनक्रिया चांगली राहण्यासाठीही मोसंबीचा रस फायदेशीर आहे. आपल्या सुंगधाने आणि अॅसिडमुळे मोसंबीचा रस पचनक्रिया चांगली ठेवतो. 

7) रोज मोसंबीचा रस प्यायल्याने रक्त संचार योग्यप्रकारे होतो. मोसंबीचा रस आपली रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवते. याने अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती मिळते. 

8) मोसंबीमध्ये कॅलरीजचं प्रमाण अधिक प्रमाणात असते. त्यामुळे याचा वजन कमी करण्यातही मदत होते. मोसंबीचा रस मधासोबत प्यायल्यास वजन कमी होऊ शकतं. 

9) डोळ्यांसाठीही मोसंबीचा रस फायदेशीर मानला जातो. पाण्यात मोसंबीच्या रसाचे काही थेंब टाकून डोळे धुतल्यास कोणत्याही इन्फेक्शनपासून तुम्हाला आराम मिळेल. 

10) मोसंबीचा रस चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स आणि काळे डाग निघून जातील. मोसंबीचा रस प्यायल्याने रक्त स्वच्छ होतं. यामुळे त्वचेचा रंगही उजळतो. 

11) मोसंबीचा रस पाण्यात मिश्रित करुन प्यायल्यास घामाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य