शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

सकाळी रिकाम्या पोटी 'या' डाळीचं पाणी पिऊन फॅटी लिव्हरची समस्या होईल दूर, बॅड कोलेस्ट्रॉलही होईल कमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 14:08 IST

Moong Dal Water Benefits : या डाळी शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. डाळींमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं.

Moong Dal Water Benefits : वेगवेगळ्या डाळींचं सेवन करण्याचा सल्ला नेहमीच डॉक्टर देत असतात. कारण या डाळी शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. डाळींमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं.

तुम्हाला आठवत असेल की, आजारी पडल्यावर मूग डाळ खाण्याचाच सल्ला जास्त दिला जातो. कारण मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. जे खूप फायदेशीर असतात. अनेकदा मूग डाळीचं पाणी पिण्याचाही सल्ला दिला जातो. याचं कारण आज आपण जाणून घेऊया. 

मूग डाळीच्या पाण्यातील पोषक तत्व

एक्सपर्ट सांगतात की, सामान्यपणे एक वाटी मूग डाळीच्या पाण्यात प्रोटीन १४ ग्रॅम, फॅट १ ग्रॅम, फायबर १५ ग्रॅम, फॉलेट ३२१ मायक्रोग्रॅम, शुगर ४ ग्रॅम, कॅल्शिअम ५५ मिली, मॅग्नेशिअम ९७ मिली, झिंक ७ मिली असतं. त्यासोबतच या डाळीच्या पाण्यात व्हिटॅमिन बी१, बी५, बी६, थियामिन, डायटरी फायबर आणि रेजिस्टेंट स्टार्चही भरपूर असतं.

कसं बनवाल मूग डाळीचं पाणी?

मूग डाळीचं पाणी तयार करण्यासाठी कुकरमध्ये दोन कप पाणी गरम करा. या गरम पाण्यात मूग डाळ टाका आणि चवीनुसार मीठ टाकून साधारण २ ते ३ शिट्या होईपर्यंत शिजवा. त्यानंतर डाळ चांगली बारीक करा. यातील पाणी वेगळं काढा. तुमचं डाळीचं पाणी पिण्यासाठी तयार आहे. 

मूग डाळीच्या पाण्याचे फायदे

मूग डाळीमध्ये फायबर आणि काही अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे पचन तंत्र मजबूत करण्यास मदत करतात. सोबतच लिव्हरचं कामही चांगलं करतात. मूग डाळीच्या पाण्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. फॅटी-लिव्हरची समस्या असलेल्या लोकांनी जर सकाळी रिकाम्या पोटी या डाळीचं पाणी सेवन केलं तर खूप फायदा मिळतो. तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासही याने मदत मिळते.

डिटॉक्सीफायर आहे मूग डाळ

मूग डाळीचं पाणी शरीर डिटॉक्सीफाय करतं आणि पचनक्रिया सुधारतं. ज्यामुळे पोट साफ राहतं आणि ब्लॅडरही हेल्दी राहतं. तसेच याने लघवीसंबंधी समस्याही दूर होतात. सोबतच ज्या लोकांना वजन कमी करायचं असतं त्यांच्यासाठीही सुद्धा हे पाणी फार महत्वाचं असतं.

लठ्ठपणा कमी होतो

बदलती लाइफस्टाईल आणि धावपळीच्या जीवनामुळे आजकाल लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. लोकांना लठ्ठपणाची समस्या जास्त होत आहे. तुम्हालाही लठ्ठपणा कमी करायचा असेल तर मूग डाळीच्या पाण्याचं सेवन सुरू करा. याने मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

मूग डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला डायबिटीस असलेल्या रूग्णांना दिला जातो. कारण मूग डाळीचं पाणी शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासोबतच मूग डाळ ब्लड ग्लूकोजला नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. ज्याने डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.

डेंग्यूपासून बचाव

पावसाळा आला की, डासांची समस्या वाढते. या दिवसात डेंग्यू होण्याचा धोकाही जास्त असतो. अशात मूगाच्या डाळीचं पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. या डाळीचं पाणी सेवन करून इम्यून सिस्टम बूस्ट होतं, ज्याने डेंग्यूसारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो.

लहान मुलांसाठी फायदेशीर

मूग डाळीच्या पाण्यात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, जे लहान मुलांसाठी फार फायदेशीर असतात. सर्वात खास बाब ही आहे की, या डाळीचं पाणी सहजपणे पचतं. या डाळीने लहान मुलांची इम्यून पॉवर वाढते आणि त्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून त्यांचा बचाव होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य