शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मधुमेह असलेल्या लोकांनी पावसाळ्यात असा ठेवावा डेली रुटीन! फॉलो करा 'या' खास टिप्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 16:28 IST

पावसाळ्यात मुधुमेह, हृदयरोग असणाऱ्या लोकांनी आरोग्य सबाधित राखण्यासाठी योग्य पोषण आणि जीवनशैलीतील बदल गरजेचा आहे.

Health Tips :  उच्चआर्द्रता , वारंवार पाऊस आणि संक्रमणाचा वाढता धोका यामुळे आरोग्य व्यवस्थापनात गुंतागुंत होऊ शकते. या काळात विशेषतः मधुमेह तसेच  हृदयरोग असणााऱ्या लोकांनी आरोग्य सबाधित राखण्यासाठी योग्य पोषण आणि जीवनशैलीतील बदल गरजेचा आहे. अर्थातच त्यासाठी त्यासाठी सर्व ऋतूंमध्ये हंगामी फळांचा, भाज्यांचा जेवणात समावेश करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय आहारतज्ज्ञ सांगतात.

हंगामी फळे, भाज्यांचे फायदे?

१) सुरळीत पचनास मदत करतात.

२) सामान्य गॅस्टोइंटेस्टाइनल समस्या टाळतात.

३) हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देतात.

४) पित्त काढून टाकतात.

५) रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

६) रक्तदाब नियंत्रित करतात.

हळद, मिरी त्याच्या शक्तीशाली दाहक-विरोधी आणि  अ‍ॅटिऑक्सिडंट गुणधर्मासह जळजळ कमी करण्यात व रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. कर्फ्यूमिनचे शोषण वाढवते आणि चयापचय क्रिया सुधारते. आले आणि लसूण हे हृदय-संरक्षणात्मक फायदे देतात. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करत हृदयाच्या आरोग्यास मदत करतात.

हंगामी भाज्यांमध्ये कारले, पडवळ, दुधी, बीटरूट, मुळा, सुरण, शिराळे, घोसाळे अशा विविध प्रकारच्या भाज्या जेवणात असाव्यात. या भाज्या नैसर्गिकरीत्या हवामानाच्या गरजांशी जुळवून घेतात. त्यामुळे या हंगामासाठी त्या उत्तम आहेत.

हंगामी फळे खा!

पावसाळ्यात सफरचंद, जांभूळ, पेर, प्लम्स, चेरी पीच, सीताफळ ही फळे खा. ही सर्व फळे केवळ जीवनसत्त्वांनी भरलेली नसून शरीराला चांगल्या प्रकारे हायड्रेटेड ठेवण्यास आणि शरीरातील जास्त सूज टाळण्यास मदत करतात.

व्यायाम करा, फीट राहा!

१) पावसाळ्यात तुम्ही योगासने, पिलेट्स असे व्यायाम करू शकता. साधे स्ट्रेचिंग किंवा पाऊस थांबला तर बाहेर थोडे चालण्याचा प्रयत्न करा.

२) नियमित व्यायामामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते.

३) मधुमेह आणि हृदयाच्या समस्यांसारख्या परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी इन्शुलिन संवेदनशीलता आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य वाढवण्यास मदत होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सmonsoonमोसमी पाऊसdiabetesमधुमेहLifestyleलाइफस्टाइल