शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Monkeypox : 'सेक्स'मुळे पसरतोय व्हायरस? बाधितांचा शोध घेणंही झालंय कठीण! एक्सपर्ट्सनी केलं अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 01:00 IST

संबंधित रिपोर्टमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात येत असलेल्या अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स व्हायरसची लागण झालेले लोक, कुणा-कुणाच्या संपर्कात आले, याचा शोध घेणे येथील सार्वजनिक आरोग्य अधिकार्‍यांना अत्यंत कठीण जात आहे. कारण अनेक लोकांचे क्रुझिंग ग्राउंड, सेक्स क्लब आणि केमेक्स सेशन दरम्यान अनेक अज्ञात लैंगिक जोडीदार असतात, असे एका रिपोर्टमध्ये म्हण्यात आले आहे. टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, यूके हेल्थ अँड सेफ्टी एजन्सीने (यूकेएचएसए) आजारासंदर्भात दिलेल्या पहिल्या टेक्निकल ब्रिफिंगमध्ये, 45 पुष्टी झालेल्या प्रकरणांच्या माहितीचा समावेश आहे. ज्यात त्यांच्या त्यांच्या लैंगिक आरोग्यासंदर्भात विचारण्यात आले होते.

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय व्हायरस?संबंधित रिपोर्टमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात येत असलेल्या अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. जवळपास सर्वच (98 टक्के) प्रकरणांमध्ये इनक्युबेशन पिरयड दरम्यान इतर पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवल्या गेल्याची नोंद झाली आहे. यांपैकी जवळपास अर्ध्या म्हणजेच (44 टक्के) लोकांनी गेल्या तीन महिन्यांत 10 हून अधिक लैंगिक भागीदारांसोबत आणि सामूहिक सेक्स केल्याचे नोंदवले आहे. 

याच बरोबर, 45 पैकी 20 जणांनी 'सेक्स-ऑन-प्रिमायसेस' मध्ये भाग घेतल्याचेही म्हटले आहे. जसे सौना, डार्क रूम अथवा यूके अथवा परदेशात सेक्स क्लबमध्ये इन्क्यूबेशन पिरियड दरम्यान. तर जवळपास 64 टक्के लोकांनी डेटिंग अॅपच्या माध्यमाने नव्या जोडिदारांना भेटले, असेही या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे.

ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्ण - ब्रिटनमध्ये गेल्या 12 जूनपर्यंत यूकेएचएसएने मंकीपॉक्सची लागण झालेले 104 अतिरिक्त रुग्ण शोधून काढले आहेत. यामुळे आता येथील एकूण रुग्णांची संख्या 470 वर पोहोचली आहे. यात इंग्लंडमध्ये 452, स्कॉटलँड मध्ये 12, उत्तर आयरलंडमध्ये दोन आणि वेल्स मध्ये चार जणांचा समावेश आहे. 

टॅग्स :Englandइंग्लंडHealthआरोग्यSex Lifeलैंगिक जीवन