शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांची चिंता वाढली; सतर्कता बाळगण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 18:46 IST

Monkeypox Cases in India: व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरातील लोकांची चिंता वाढली आहे.

नवी दिल्ली : देशात मंकीपॉक्सचे एकूण 8 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरातील लोकांची चिंता वाढली आहे. अनेक रुग्णांचा परदेश दौऱ्याची कोणतीही हिस्ट्री सुद्धा नाही, हे एक चिंतेचे कारण आहे. अशा स्थितीत मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव जेवढा वाटला होता, त्यापेक्षा जास्त पसरल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, केरळमधून एकूण 5 आणि दिल्लीमधून 3 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी केरळमधील पाचवा रुग्ण यूएईच्या दौऱ्यावरून आला आहे, ज्याचे वय 35 वर्षे आहे. तसेच, मंकीपॉक्समुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती केरळ राज्य सरकारने सोमवारी दिली आहे.दिल्लीत तीन रुग्ण समोर आले, त्यापैकी एकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मात्र, दिल्लीत रुग्णलयात दाखल झालेल्या नवीन रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा परदेश प्रवासाची हिस्ट्री नाही. दोन लोक नायजेरियन वंशाचे असून ते दिल्लीत दीर्घकाळापासून राहतात. त्यापैकी एक हॉटेलमध्ये काम करतो. मात्र, हे दोन्ही लोक एका आफ्रिकन व्यक्तीच्या संपर्कात आले होते. याशिवाय एका महिलेला दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

जास्त सतर्क राहण्याची आश्यकताया महिलेचेही परदेश दौऱ्याची कोणतीही हिस्ट्री नाही आहे. याचा अर्थ लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण देशात अशी प्रकरणे आहेत की मंकीपॉक्स कुठून आला, हे शोधणे कठीण जात आहे. म्हणजेच देशात अशी अनेक प्रकरणे आहेत, ज्यांना मंकीपॉक्स आहे, पण ते सरकारच्या रडारवर नाहीत. विशेष म्हणजे, केरळमध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मंकीपॉक्स जीवघेणा ठरू शकतो की काय अशी भीती लोकांमध्ये पसरली आहे. पण रिपोर्ट्सनुसार, मृत्यू झालेल्या व्यक्तीला व्हायरल एन्सेफलायटीस झाला होता. त्यामुळे त्या व्यक्तीमधील मल्टी ऑर्गन क्लिअर ​​झाले.

आयसोलेशनमध्ये राहण्याची गरजलोकनायक रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ सुरेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्याची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत असेल, त्याला कर्करोगासारखा आजार असेल किंवा त्याला इतर अतिशय जुनाट आणि गंभीर आजार असतील, तर मंकीपॉक्स धोकादायक ठरू शकतो. अन्यथा, सामान्य प्रकरणांमध्ये, रुग्ण जास्तीत जास्त 21 दिवसांत बरा होतो. पण, या 21 दिवसांमध्ये रुग्ण आयसोलेशनमध्ये राहिला पाहिजे.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत