शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शरीरावरील 'या' खुणा आहेत कॅन्सरची लक्षणं, वेळीच ओळखा अन्यथा पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 16:55 IST

चामखिळी या काळ्या किंवा भुरकट रंगाच्या असतात आणि त्वचेवर कुठेही त्या तयार होऊ शकतात. बहुतांश वेळा बालपणापासून ते वयाच्या 25 वर्षापर्यंत चामखीळ तयार होतात.

एखाद्या व्यक्तीच्या चेहरा किंवा मानेवर चामखीळ असणं ही अतिशय सामान्य बाब आहे. अनेकांच्या शरीरावर चामखीळ दिसते. याचा त्रास काही नसला तरी याच्यामुळे व्यक्तीच्या सौंदर्यात भर पडण्याऐवजी याचे दुष्परिणामच अधिक दिसून येतात. त्वचेवर असलेली चामखीळ अनेक प्रकारची असू शकते. चामखिळी या काळ्या किंवा भुरकट रंगाच्या असतात आणि त्वचेवर कुठेही त्या तयार होऊ शकतात. बहुतांश वेळा बालपणापासून ते वयाच्या 25 वर्षापर्यंत चामखीळ तयार होतात.

एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर कमीतकमी 10 व जास्तीत जास्त 40 पर्यंत चामखिळी असू शकतात. कालांतराने या चामखिळींच्या रंगांत बदल झाल्याचंही दिसून येतं. काहीवेळा तर चामखिळीवर केस उगवण्याचे प्रकारही घडतात. बहुतांश वेळा चामखिळीचा कॅन्सरशी संबंध नसतो. परंतु याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. चामखिळीचा आकार किंवा रंगात बदल होत असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं.

चामखिळीमुळे कॅन्सर होतो का?वेब एमडीने दिलेल्या माहितीनुसार, जन्मपासून ज्या व्यक्तींच्या शरीरावर चामखीळ किंवा तीळ असतो, अशा 100 पैकी एखाद दुसऱ्या व्यक्तीला मेलानोमा म्हणजेच कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. थेरपी सेंटर डॉट कॉमनुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरील तीळ किंवा चामखीळ एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या दिसत असतील तर हा चिंतेचा विषय ठरू शकतो. चामखीळ एका बाजूला टोकदार असेल तर ही त्वचेच्या कॅन्सरची सुरुवात असू शकते. या कॅन्सरचा इशाराही असू शकतो. जर चामखिळीचा रंग एकमेकांपेक्षा वेगळा असेल तर ते धोकादायक ठरू शकतं.

ही असू शकते धोक्याची घंटाचेहरा, मान किंवा शरीरावर अनेक ठिकाणी चामखीळ आढळते. त्या लाल, पांढऱ्या, गुलाबी, भुरकट तसेच काळ्या रंगाच्या असतात. चेहरा किंवा मानेवर चामखीळ येत असल्यास याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चामखिळीचा रंग आणि आकार या दोन्हीत बदल होत असल्यास त्वचेच्या कॅन्सरची ही सुरूवात असू शकते.

दरम्यान, शरीरावर येणाऱ्या चामखीळ आनुवंशिक असतात तर कधी शरीरातील बदलणाऱ्या हॉर्मोन्समुळे पण आढळतात. शरीरावर चामखिळींची संख्या जास्त असल्यास ते सौंदर्यात बाधक ठरू शकतं. बऱ्याचदा तज्ज्ञ शस्त्रक्रिया करून चामखीळ काढण्यास सांगतात. पण काही घरगुती उपाय करून याला नाहीसं करता येऊ शकतं. यात प्रामुख्यानं लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करून ती चामखिळीवर लावावी. आठवड्यातून किमान 3-4 वेळा असं केल्यानं याचा परिणाम दिसून येऊ शकतो. याशिवाय खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडाही चामखिळीला नाहीसं करण्यास फायदेशीर ठरतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स