शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मोहिनी चॉकलेटची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 6:04 AM

चॉकलेट म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते ते मिल्क चॉकलेट. हल्ली पाहुणे घरी येणे तसे सोशल मीडियामुळे फारच कमी झालेले आहे. आपण कुठे आहोत

अर्चना देशपांडे-जोशीचॉकलेट म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते ते मिल्क चॉकलेट. हल्ली पाहुणे घरी येणे तसे सोशल मीडियामुळे फारच कमी झालेले आहे. आपण कुठे आहोत आणि काय करत आहोत, याची बातमी सतत आपण शेअर करत असतो. त्यामुळे भेटून बोलायला विषयच शिल्लक राहत नाही. एक काळ असा होता की, ठरवून मामा, काका यांच्या घरी जाणे होत असे. असे पाहुणे येत तेव्हा बिस्किटांपेक्षा चॉकलेट किंवा लॉलीपॉप आणणारा पाहुणा लाडका होता. मिल्क चॉकलेट हे तसे श्रीमंत चॉकलेट होते. रावळगावची टॉफी ही सगळ्यांनाच आवडत असे. चारचार रावळगाव हातावर पडले की, स्वारी खूश. काजूचे म्हणून गुलाबी, पिवळ्या आणि केशरी रंगाचे चौकोनी चॉकलेट कधीतरी बघायला मिळत असे. टॉफी या नावाखाली कॉफी, लेमन, कोला, आॅरेंज असे नानाविध फ्लेव्हर असलेली चॉकलेट खरंतर गोळ्या या सदरातच मोडत असत. चॉकलेट खाणे म्हणजे दाताची वाट लावून घेणे, असे अजूनही समजले जाते. प्रत्यक्षात आपण काहीही खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरणे आणि व्यवस्थित दात स्वच्छ ठेवणे याकडे लक्ष न दिल्याने दात खराब होत असतात. दोष मात्र विनाकारण चॉकलेटला.चॉकलेट खाण्याबरोबरच त्याच्या चांद्या पुस्तकात जपून ठेवणे हा अनेकांचा छंदच होता. काही कंपन्यांनी याचा व्यापारी फायदा करून घेताना याच्या रॅपरसोबत विमानाची, गाड्यांची, क्रिकेटर्सची चित्रे जोडून ती जमा करण्याचा नादच मुलांना लावला होता. अमुक प्रकारची चित्रे जमा झाली की, एखादा अल्बम पुन्हा चित्रे जमवून चिकटवण्यासाठी मिळत असे. अल्बम पूर्ण केला की, एखादे बक्षीस पदरात पडे; पण तोपर्यंत बरीच पदरमोड होऊन चॉकलेट खाणे हे नित्यनेमाने घडत असे. देशी तसेच परदेशी चॉकलेटची रेलचेल वाढली आणि शॉपिंग मॉल ही संकल्पना रुजली तसे वाणी आणि त्याच्याकडील चॉकलेटची बरणी इतिहासजमा होऊ लागली आहे. अनंत प्रकारची चॉकलेट आली तरी मिल्क चॉकलेटला पर्याय नाही. स्वीसमध्ये या चॉकलेटना इतका मान दिला जातो की, त्यांना हात लावत नाहीत, तर ती चमचानेच उचलावी लागतात. होममेड चॉकलेटचे अनंत प्रकार, आकार आणि रंग रोज नव्याने जन्म घेत असतात.डार्क या चॉकलेटची टेस्ट स्ट्राँग असते. काहीशी कडवटही असते; पण यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या रोजच्या चॉकलेटपेक्षा जरा वेगळीच चव असलेल्या या चॉकलेच्या भेटीतून आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबाबतीत त्याची आपल्याला काळजी असल्याचं आपण सूचित करत असतो. आपण त्या व्यक्तीवर अवलंबून आहोत, हे पण ‘डार्क’चॉकलेट दाखवून देत असते. साधारण कडक चव असलेली ही चॉकलेट आपण आपल्या जोडीदाराचे रक्षण करू किंवा काळजी घेऊ, असे सुचवत असते.सफेद किंवा व्हाइट चॉकलेट ही मृदू आणि एलिंगट असतात. याची चव सगळ्यांनाच आवडत नाही. आपल्याकडे त्या मानाने ती कमी लोकप्रिय आहेत. याची भेट क्लासिक मानली जाते आणि चव काहीशी सौम्य असल्याने एक ‘गोड’ भेट म्हणून पण याच्याकडे पाहिलं जातं. आपल्याला आवडणारी व्यक्ती गोड स्वभावाची असेल तर ही भेट तिला नक्कीच आवडेल.सर्वात लोकप्रिय चॉकलेटचा प्रकार म्हणजे मिल्क चॉकलेट म्हणजे हे व्हाइट चॉकलेट नव्हे बरं! याच्या लोकप्रियतेमुळे आणि एका विशिष्ट पद्धतीने केलेल्या व्यापारीकरणामुळे भारतात असा मोठा गैरसमज आहे की, मिल्क म्हणजे सफेद किंवा व्हाइट. भारतात मिल्क चॉकलेटला खूपच लोकप्रियता मिळालेली आहे. प्रेम या भावनेशी मिल्क चॉकलेटला जोडले जाते.चॉकलेट खाणे हे प्रमाणात असेल तर प्रकृतीसाठी उपयुक्त आहे. तसेच आपली त्वचा आणि चेहरा यावर पण ते उपयोगी आहे. त्वचेला सुरकुत्या न येणे, ती तजेलदार राहाणे यासाठी ते उपयुक्त आहे. हिमालयातील उंचीवर चॉकलेट खाणे औषधाप्रमाणे उपयोगी पडते. थकवा आला किंवा तोंडाची चव गेली तर चॉकलेट चघळा आणि मजेत राहा आणि त्याची चांदी फेकून कचरा करण्यापेक्षा त्याचा हस्तकलेसाठी वापर करा.