शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

लवकर वजन कमी करण्यासाठी रनिंगची योग्य पद्धत कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 10:44 IST

लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी लोक काय-काय करतात हे सर्वांनाच माहीत आहे. यातील सर्वात लोकप्रिय उपाय म्हणजे रनिंग.

(Image Credit : mindbodygreen.com)

लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी लोक काय-काय करतात हे सर्वांनाच माहीत आहे. यातील सर्वात लोकप्रिय उपाय म्हणजे रनिंग. वजन कमी करण्यासाठी रनिंग हा सर्वात चांगला व्यायाम मानला जातो. रनिंग म्हणजेच धावल्याने शरीराच्या अवयवांची एकत्र एक्सरसाइज होते. मात्र, तुम्हीही वजन कमी करण्यासाठी रनिंग करत असाल तर तुम्हाला रनिंगची योग्य पद्धत माहीत असायला हवी.

रनिंग खासकरून अशा महिलांसाठी अधिक गरजेची असते, ज्या महिला लठ्ठपणाच्या शिकार होत आहेत. कारण जेव्हा तुम्ही रनिंग करता तेव्हा केवळ लठ्ठपणाच कमी होतो, असं नाही तर शरीरही फिट राहतं. जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल तर रनिंगच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(Image Credit : medicalnewstoday.com)

रनिंग करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं नुकसानही होऊ शकतं. जर तुम्हीही रोज रनिंग करत असाल तर रनिंगची योग्य पद्धत जाणून घेतली पाहिेजे. चला जाणून घेऊ काही टिप्स...

काय करू नये?

(Image Credit : marinweightloss.com)

जर तुम्ही रनिंग करणं नुकतंच सुरू करत असाल तर जास्त वेगाने रनिंग करणे टाळलं पाहिजे. कारण जर तुम्ही सुरूवातीलाच वेगाने रनिंग करू लागता तेव्हा लवकर थकवा जाणवतो आणि मसल्समध्ये वेदना होत असल्याने अनेकजण रनिंग बंद करतात. जेव्हाही रनिंगसाठी तयारी कराल तेव्हा पहिल्या आठवड्यात हळू रनिंगने सुरूवात करा. त्यासोबतच रनिंग करण्याआधी स्ट्रेचिंग एक्सरसाइज नक्की करावी. वेगाने रनिंग केल्याने तुम्ही लवकर थकाल आणि वजन कमी करण्यासाठी गरजेच्या कॅलरी बर्न होणार नाहीत.

डाएटमध्ये काय घ्यावं?

(Image Credit : soposted.com)

जर तुम्ही रोज रनिंग करत असाल तर तुम्ही डाएटवरही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही विचार करत असाल तर की, केवळ रनिंग करून वजन कमी कराल तर तुम्ही चुकताय. रनिंगसोबतच आहारात पोषक तत्वांचा समावेश करावा. त्याशिवाय वजन कमी होणार नाही.

तसेच शरीराला जेव्हा आवश्यक पोषण मिळत नाही तेव्हा रनिंगचा फायदा मिळत नाही. त्यामुळे रनिंग करण्याआधी तुमच्या डाएट एक्सपर्टकडून डाएट चार्ट तयार करून घ्या. आहारात प्रोटीन, कॅल्शिअम आणि फायबरचा समावेश करावा. जर तुम्ही रोज धावत असाल दूध आणि पनीरचा आहारात समावेश करा.

पोश्चरवर द्या लक्ष

(Image Credit : skinnyms.com)

रनिंग करतेवेळी तुम्ही पोश्चर योग्य असणं गरजेचं आहे. नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे रनिंग करताना शरीर सरळ आणि नजर समोर असली पाहिजे. तसेच रनिंग करताना पाय जोराने जमिनीवर आपटणे देखील चुकीचे ठरेल. कारण याने जॉइंट्समध्ये समस्या होऊ शकते.

योग्य शूज आणि कपड्यांची निवड

(Image Credit : getrunningshoes.com)

रनिंग सुरू करण्याआधी योग्य शूजची निवड करावी. कारण चुकीचे शूज वापरून तुमच्या मसल्सला जखम होऊ शकते. अनेकदा काही लोक चप्पल किंवा सॅंडल घालून रनिंग करतात. पण चप्पलची पायात व्यवस्थित पकड बसत नाही. त्यामुळे अर्थात व्यवस्थित रनिंग करता येणार नाही. तसेच सैल आणि आरामदायी कपड्यांचा वापर करावा.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स