शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

पुरुषांनो, या लक्षणांवर लक्ष ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 01:29 IST

काम व आरोग्यदायी जीवन यामध्ये योग्य संतुलन राखण्याच्या आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये, असे आढळून आले आहे की महिलांच्या तुलनेत पुरूष त्यांचे आरोग्य व फिटनेसबाबत कमी जागरूक आहेत.

- अमोल नायकवडीकाम व आरोग्यदायी जीवन यामध्ये योग्य संतुलन राखण्याच्या आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये, असे आढळून आले आहे की महिलांच्या तुलनेत पुरूष त्यांचे आरोग्य व फिटनेसबाबत कमी जागरूक आहेत. उच्च तणावग्रस्त जीवनशैलीचा वाढता ताण, जंकफूडसह कोलेस्ट्रॉलची भर आणि व्यायामासाठी वेळेचा अभाव अशा कारणांमुळे, पुरूष जीवनविषयक आजारांपासून अधिक पीडित आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे व शरीराच्या इतर अवयवांमध्ये आजार निर्माण होण्याची शक्यता असते. या आजारांची लक्षणे दिसत नसली, तरी छोटासा आजार आरोग्यविषयक मोठ्या आजाराचे चिन्ह असू शकतो. जीवनशैली आजारांपासून पीडित लोकांची संख्या झपाट्याने वाढत असताना, आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची वेळ आली आहे.सामाजिक अडथळ्यांमुळे पुरुष डॉक्टरांचा सल्ला घेणे टाळतात. पण, काही महत्त्वपूर्ण लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने, ते खरेतर मोठया समस्येला आमंत्रण देत आहेत. शारीरिक चिन्हे व लक्षणे मोठया आजाराबाबत आपल्याला दक्ष करतात. व्यक्तीने ही लक्षणे समजून घेतली पाहिजेत आणि जीवनशैलीतील वाढत्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याकरिता नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.काही चिन्हे, ज्याकडे पुरूषांनी विविध कारणांसाठी लक्ष दिले पाहिजे.पिसोनियस सायनस : हा लहानसा गळू आहे, जो नितंबाच्या वरील बाजूस असलेल्या फटीमध्ये होतो. पुरूषांना हा आजार अधिक प्रमाणात होतो आणि तरूण प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून येतो. संसर्गाची सामान्य चिन्हे म्हणजे बसताना किंवा उभे राहताना वेदना होणे. फटीमध्ये सूज येणे, त्वचा लालसर होणे, भागाभोवती त्वचेवर व्रण येणे, गवूमधून पू किंवा रक्त बाहेर पडणे, जखमेमधून केस बाहेर पडणे.प्रतिबंधात्मक उपाय : स्वच्छता राखण्याकरिता भाग कोरडा व स्वच्छ ठेवा, तसेच दीर्घकाळापर्यंत बसणेसुद्धा टाळा.थायरॉईड : थॉयराईड असलेल्या पुरूषांमध्ये स्नायूवेदना, एकाग्रतेमध्ये समस्या आणि लगेच थकून जाणे अशी लक्षणे दिसून येतात. काही पुरूषांना इरेक्शन्स असण्यामध्येसुद्धा समस्या जाणवते.प्रतिबंधात्मक उपाय : आपले आरोग्य आनंदी व फिट ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणून सुलभ कामाचा अवलंब करा, सुट्टीवर जा, चिंतन करा किंवा गाणे ऐकणे वा नृत्य असे छंद जोपासा. शरीराला नवचैतन्य प्राप्त होत असताना, आरोग्यदायी मन असणेसुद्धा महत्त्वाचे असते!निद्रानाश : महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये निद्रानाशाचे प्रमाण दुप्पट आहे. तीव्र व मोठ्या आवाजात घोरणे, धापा टाकत उठणे, दिवसभर आवसलेल्यासारखे वाटणे व डोकेदुखी ही लक्षणे आहेत.प्रतिबंधात्मक उपाय : अतिरिक्त चरबी व वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. बॉडी मास इंडेक्स आरोग्यदायी पातळीवर आणा; आपल्या रोजच्या आहारामध्ये साधे बदल करण्यासह ही गोष्ट साध्य करता येऊ शकते. अधिक उपायांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.टेस्टिक्युलर व कॅन्सर : ओटीपोट किंवा मांडीच्या सांध्याखाली हळुवार वेदना होणे, पाठीच्या खालील बाजूस होणारी पाठदुखी, धाप लागणे, छातीत दुखणे, पायांना सूज येणे ही टेस्टिक्युलर व कॅ न्सरसाठी असामान्य लक्षणे आहेत. अंडकोषाच्या दोन्ही बाजूस वेदनारहित गाठ येणे व सूज येणे.प्रतिबंधात्मक उपाय: नियमित कालांतराने अंडकोषांची तपासणी करा, ज्यामुळे असामान्य अशी बाब निदर्शनास येऊ शकते, जसे आकार, वजन किंवा घडणमध्ये बदल.कोलोरेक्टल व कॅ न्सर : कोलोरेक्टल व कॅ न्सर हा सर्वाधिक पुरूषांमध्ये दिसून येतो. पुरूषांमध्ये फायबर कमी असलेल्या आहाराचे सेवन, दारू व तंबाखूचे अधिक प्रमाणात सेवन अशा सवयी असतात. ओटीपोटीत सतत वेदना होणे, थकवा, विष्ठेमध्ये रक्त, आंत्र सवयींमध्ये बदल, अतिसाद व अनपेक्षितपणे वजन कमी होणे ही लक्षणे आहेत.प्रतिबंधात्मक उपाय : उच्च मेदयुक्त आहाराचे सेवन व धूम्रपान कमी करा. डॉक्टरांना भेटून लवकारात लवकर तपासणी करा.ह्दयाघात : छाती भरल्यासारखेवाटणे, हृदयाच्या डाव्या बाजूस काही मिनिटांहून अधिक काळ छातीत दुखणे, धाप लागणे व घाम सुटणे ही हृदयाघाताचीलक्षणे आहेत.प्रतिबंधात्मक उपाय : उच्च रक्तदाब हृदयाघाताचा धोका वाढवतो. योग्य रक्तदाब पातळी राखण्याचा प्रयत्न करा. ताण व्यवस्थापन, आरोग्यदायी आहार व नियमितपणे व्यायाम हे रक्तदाब नियंत्रित राखण्यामध्ये मदत करू शकतात.(लेखक प्रतिबंधात्मक हेल्थकेअर स्पेशालिस्ट आहेत.)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स