शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

उंचावरुन कोसळणे ते कुणीतरी पाठलाग करत आहे अशी स्वप्न पडणे, याचा नेमका अर्थ काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 16:19 IST

बहुतांश वेळा आपण रात्री झोपेत पडलेली स्वप्नं विसरूनही जातो; पण काही स्वप्नं मात्र आपला पिच्छा सोडत नाहीत. या स्वप्नांचा नेमका अर्थ काय असेल, या शंकेनं आपण अस्वस्थ होतो. अशा काही स्वप्नांचा अर्थ प्रसिद्ध लेखिका थेरेसा चियुंग यांनी सांगितला आहे.

स्वप्नांमुळे (Dreams) माणसाचं आयुष्य सुंदर झालं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आपल्याला पडणारी सुंदर स्वप्नं किती आनंद (Happiness) देऊन जातात. सगळयांना स्वप्नांच्या दुनियेत रमून जायला आवडतं; पण सुंदर स्वप्नांप्रमाणे काही वेळा वाईट, भीतीदायक स्वप्नंही पडतात. अनेकांना अतिशय चित्रविचित्र स्वप्नं पडत असतात. काही वेळा त्यांचा काहीही अर्थ लागत नाही. बहुतांश वेळा आपण रात्री झोपेत पडलेली स्वप्नं विसरूनही जातो; पण काही स्वप्नं मात्र आपला पिच्छा सोडत नाहीत. या स्वप्नांचा नेमका अर्थ काय असेल, या शंकेनं आपण अस्वस्थ होतो. अशा काही स्वप्नांचा अर्थ प्रसिद्ध लेखिका थेरेसा चियुंग यांनी सांगितला आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

उंचावरून पडणं : तुम्ही उंचावरून पडत (Falling Down) असल्याचं स्वप्न पाहत असाल, तर याचा अर्थ असा आहे, की तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहेत. त्यामुळे असं स्वप्न पडलं तर सावध होण्याची गरज आहे.

गर्दीत नग्नावस्थेत दिसणं : गर्दीत आपण नग्नावस्थेत (Naked in Public) असल्याचं स्वप्नात दिसलं, तर त्याचा अर्थ असा होतो, की दिखाव्यामुळे हरवलेली तुमची निरागसता जपा. तुम्ही जसे आहात तसे जगा. समाजासाठी मुखवटा घालून जगताना स्वतःला हरवून बसला आहात, त्यातून बाहेर पडा. तुमचं खरं स्वरूप स्वीकारा.

कोणी तरी तुमचा पाठलाग करत आहे : या स्वप्नाचा अर्थ असा होतो, की वास्तविक जीवनात तुम्ही एखाद्या व्यक्तीपासून किंवा परिस्थितीपासून पळून जात आहात. तुम्ही जबाबदारीपासून दूर पळता आहात. तुम्हाला पळून न जाता परिस्थितीचा, त्या व्यक्तीचा सामना करण्याची गरज आहे.

इच्छा नसतानाही कोणाबरोबर झोपणं : स्वप्नात आपण अपेक्षित नसलेल्या व्यक्तीबरोबर निद्रितावस्थेत असल्याचं दिसलं तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू आत्मसात करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, त्या व्यक्तीची विनोदबुद्धी आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. वास्तविक जीवनात किंवा नात्यात काहीतरी गमावणार असल्याचे संकेतही या स्वप्नातून मिळतात.

मृत्यूचं स्वप्न पाहणं : अनेक जण स्वतःचा मृत्यू (Death) झाल्याचं स्वप्न पाहतात. त्यामुळे ते घाबरून जातात. याचा अर्थ असतो आयुष्यात तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीला कायमचा निरोप द्यावा लागणार आहे. तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे.

गर्भवती असणे : काही वेळा स्त्रिया स्वतः गर्भवती (Pregnant) असल्याचं स्वप्न पाहतात. हा धीर धरण्याचा संकेत असू शकतो. सध्याच्या योजना यशस्वी होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते, असा याचा अर्थ होतो.

परीक्षेसाठी तयार नसणे : बहुतांश जणांनी हे स्वप्न एकदा तरी नक्कीच पाहिलं असणार, ते म्हणजे परीक्षेची (Exam) आपली तयारीच झालेली नसणं. या स्वप्नाचा अर्थ असा आहे, की आपणच तयार केलेले मापदंड किंवा इतरांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही, याची खंत तुम्हाला जाणवत आहे. असं स्वप्न पडलं असेल, तर तुम्हाला स्वतःला प्रोत्साहन देण्याची आणि स्वतःच्या अटींवर जीवन जगण्यासाठी तयार करण्याची गरज आहे. आपल्यातल्या उणिवापेक्षा आपल्या चांगल्या बाजूंवर लक्ष केंद्रित करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स