शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:36 IST

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या समाजात नात्यांमधील विवाहाची परंपरा आहे. परंतु...

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या समाजात नात्यांमधील विवाहाची परंपरा आहे. विशेषतः मामाच्या मुलीशी किंवा इतर जवळच्या नात्यांतील व्यक्तींशी विवाह करण्याची पद्धत काही समाजांमध्ये आजही पाहायला मिळते. मात्र, अशा विवाहांमुळे बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

आरोग्य साक्षरतेच्या वाढत्या जागृतीमुळे नात्यातील विवाहांचे प्रमाण काहीसे घटले असले, तरी अजूनही ते संपूर्णपणे थांबलेले नाहीत. नात्यातील विवाहांमुळे बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी अनेकवेळा अशा पद्धतीचे विवाह टाळावे. मात्र, जर नात्यात विवाह झाला, तर गर्भधारणेदरम्यान आवश्यक चाचण्या कराव्यात. यात विशेषतः बाळाची रक्तचाचणी केल्यास संभाव्य व्याधींवर उपचार करणे शक्य आहे.

गेल्या काही वर्षांत वैद्यकीय तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे आता गर्भात वाढणाऱ्या बाळामध्ये कोणत्याही गंभीर व्याधी किंवा अनुवांशिक दोष असल्यास ते गर्भधारणेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणे शक्य झाले आहे. अशा स्थितीत, जर त्या व्याधीमुळे बाळाचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता असेल, तर वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात करण्याचा पर्याय निवडता येतो. मात्र, गर्भपात केवळ विशिष्ट आठवड्यांच्या आतच कायदेशीररीत्या करता येतो. सध्या भारतात गर्भपातासाठी वैद्यकीय परवानगी २० ते २४ आठवड्यांपर्यंत आहे. काही गंभीर वैद्यकीय परिस्थितींमध्ये त्यानंतरही गर्भपात करता येतो, पण त्याला न्यायालयाची मंजुरी लागते.

‘थॅलेसिमिया’ एक गंभीर आनुवंशिक आजारनात्यात विवाह झाल्यास सर्वाधिक आढळणारा आजार म्हणजे थॅलेसिमिया. हा एक आनुवंशिक रक्तविकार असून, यामध्ये शरीरातील हिमोग्लोबिन योग्यप्रकारे कार्य करत नाही. या आजाराने बाधित मुलांना दर ४ ते ६ आठवड्यांनी रक्त चढवावे लागते. त्यामुळे अशा मुलांची विशिष्ट रक्तपेढीत नोंदणी करून नियमित रक्त द्यावे लागते. थॅलेसिमियाव्यतिरिक्तही इतर अनेक अनुवांशिक व्यंग अशा बाळांमध्ये दिसून येऊ शकतात. या मुलांसाठी दीर्घकालीन उपचारांची गरज असून, काही प्रकरणांमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट हाही पर्याय वापरला जातो. हा उपचार खर्चिक असला, तरी बरेच पालक आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी तो मार्ग अवलंबतात. 

डॉक्टर काय म्हणाले?नात्यातील विवाहानंतर गर्भधारणा झाल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. कारण अशा विवाहांमध्ये बाळाला थॅलेसिमिया, डाऊन सिंड्रोम किंवा इतर अनुवांशिक विकृती होण्याची शक्यता अधिक असते. गर्भधारणेच्या सुरुवातीला केलेली रक्तचाचणी आणि सखोल सोनोग्राफी (ॲनोमली स्कॅन) करून बाळाच्या आरोग्यस्थितीचा अंदाज घेता येतो. डॉक्टरांच्या सल्लानुसार वेळेवर निदान केल्यास गंभीर निर्णय घेणे सोपे जाते तसेच भविष्यातील गुंतागुंत टाळता येते, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर म्हणाले.

टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइलHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स