शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

बत्तीशीच आली संकटात, अनेकांना येतात केवळ २८ दात; अक्कलदाढ विलुप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 06:43 IST

प्रा. चतुर्वेदी यांच्या अभ्यासानुसार, गेल्या २० वर्षांमध्ये त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या २५ टक्के तरुणांचे २८ दात निघत आहेत.

वाराणसी: बत्तीशी दाखवू नकाे, असे अनेकदा बाेलले जाते. मित्रमंडळीमध्ये काेणी चिडविले तर हे वाक्य हमखास कानी पडते; पण ही बत्तीसीच आता संकटात आली आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर २१ व्या शतकात जन्म घेणाऱ्या अनेकांना पूर्ण ३२ दात येतच नाहीत. अक्कल दाढ गायब हाेण्याचे प्रमाण वाढत असून, अनेकांना २८ दात येत आहेत. वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठाचे दंतविज्ञान शाखेचे वरिष्ठ दंतचिकित्सक प्रा. टी. पी. चतुर्वेदी यांनी केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रा. चतुर्वेदी यांच्या अभ्यासानुसार, गेल्या २० वर्षांमध्ये त्यांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या २५ टक्के तरुणांचे २८ दात निघत आहेत.

‘थर्ड मोलर’...साधारणत: १८ ते २५ वर्षांपर्यंत चारही अक्कलदाढा निघतात. जबड्याच्या आत मागील भागामध्ये अक्कलदाढ असते. अक्कलदाढेला दंतचिकित्सिय भाषेत ‘थर्ड माेलर’ दात म्हणतात.

बदललेल्या सवयी कारणीभूतही समस्या शहरी भागातील तरुणांमध्ये जास्त दिसत आहे. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे बदललेल्या खाण्याच्या सवयी. मुलांमध्ये दातांनी कडक खाद्यपदार्थ खाणे कमी झाले आहे. भाजलेले चणे, मक्याचे कणीस, उस इत्यादी खाणे बंदच झाले आहे. 

जबड्याचा आकार लहान झाला कमी चाचण्यामुळे जबड्याचा आकार लहान झाला आहे. त्यामुळे अक्कलदाढ बाहेर येण्यासाठी जागाच राहिलेली नाही, असे प्रा. चतुर्वेदी सांगतात.

चावण्यामध्येही अडचणीअन्नाचे तुकडे करण्यासाठी समाेरच्या भागात २० दात असतात. तर अन्न चावण्यासाठी १२ दात असतात, ज्यांना आपण दाढ म्हणताे. गेल्या काही वर्षांमध्ये या दाढांची संख्याही ८ वर आली आहे. त्यामुळे लाेकांना अन्न चावण्यामध्येही अडचणी निर्माण हाेत आहेत.

अक्कलदाढ हाेणार विलुप्तमानवाच्या उत्क्रांतीमध्ये काही अवयव विलुप्त झाले. त्याचप्रमाणे पुढील काही शतकांमध्ये अक्कलदाढदेखील अशाच प्रकारे अवशेषी अवयव बनून राहील. या अवयवांचा काहीही उपयाेग राहणार नाही.