पळालेला मनोरुग्ण पुन्हा जिल्हा रुग्णालयात

By Admin | Updated: March 29, 2016 00:24 IST2016-03-29T00:24:30+5:302016-03-29T00:24:30+5:30

जळगाव : गेल्या बुधवारी जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण कक्षातून पळून गेलेल्या वाहेद झिपरु सैयद (३७, रा. गोराडखेडा, ता. पाचोरा) या तरुणास पाचोरा पोलिसांनी त्याच्या घरुन ताब्यात घेत पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Manorganisation recovered from the district hospital again | पळालेला मनोरुग्ण पुन्हा जिल्हा रुग्णालयात

पळालेला मनोरुग्ण पुन्हा जिल्हा रुग्णालयात

गाव : गेल्या बुधवारी जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण कक्षातून पळून गेलेल्या वाहेद झिपरु सैयद (३७, रा. गोराडखेडा, ता. पाचोरा) या तरुणास पाचोरा पोलिसांनी त्याच्या घरुन ताब्यात घेत पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
२३ मार्च रोजी वाहेद हा जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण कक्षातून पळून गेला होता. त्यानंतर त्याने गोराडखेडा या आपल्या गावी घरी भावाला जबर मारहाण केली होती. त्या बाबत भाऊच असल्याने तक्रार करण्यात आली नव्हती. मात्र गावातील नागरिकांनी वाहेदबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पाचोरा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार चंद्रकांत पाटील व पो.हे. कॉ. पृथ्वीराज कुमावत यांनी वाहेदला त्याच्या घरुन ताब्यात घेतले व सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्यावर औषधोपचार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्याला सोमवारी पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोहेकॉ कुमावत यांनी सांगितले. मंगळवारी वाहेदला पुन्हा जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Manorganisation recovered from the district hospital again