शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

'हा' व्यक्ती दररोज १० लिटर पाणी प्यायचा, तपासणीत समोर आला धोकादायक आजार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 11:58 IST

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल, तेव्हा फक्त एका प्रकरणात इतके पाणी पिऊ शकते. 

आपल्या शरीरासाठी पाणी हे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने दररोज म्हणजेच २४ तासांत २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ज्यामुळे शरीरातील आर्द्रतेची पातळी नियंत्रित राहते. पण, जर एखादी व्यक्ती रोज १० लिटर पाणी पित असेल तर ते आरोग्यासाठी चांगले असेल का? तर रोज इतके पाणी पिणे ही सामान्य गोष्ट नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल, तेव्हा फक्त एका प्रकरणात इतके पाणी पिऊ शकते. 

दरम्यान, आम्ही अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जो दररोज १० लिटर पाणी पितो. पण, त्या व्यक्तीच्या वैद्यकीय तपासात डॉक्टरांचा समज बदलला. जोनाथन नावाच्या ४१ वर्षांच्या व्यक्तीला खूप तहान लागत होती. त्यामुळे तो दररोज १० लिटर पाणी पित होता. डॉक्टरांना वाटले की, जोनाथन यांना मधुमेह असेल. मात्र वैद्यकीय तपासणीत त्यांच्यामध्ये मधुमेह आहे, अशी कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले की, दररोज १० लिटर पाणी  पिण्याचे कारण काय असू शकते?

डोळ्यांच्या तपासणीत समोर आलं निदानडोळ्यांमध्ये समस्या निर्माण झाल्यावर जोनाथन हे डॉक्टरांकडे गेले. तपासणीत त्यांच्या डोळ्यात एक गाठ दिसली. त्याचा एमआरआय केला असता त्यांच्या पिट्युटरी ग्लँडजवळ ब्रेन ट्यूमर असल्याचे आढळून आले. ही ग्लँड मानवी भावना नियंत्रित करते. पण त्यांच्या पिट्युटरी ग्लँडजवळ गाठ असल्याने ते काम करणे बंद झाले आणि त्यांना नेहमी तहान लागत होती. त्यामुळे ते रोजच्या गरजेपेक्षा पाचपट जास्त पाणी पित होते.

रेडिओथेरपी ३० वेळा केलीडॉक्टरांनी ट्यूमरची माहिती देताच मला धक्का बसला, असे जोनाथन यांनी डेली मेलला सांगितले. अखेर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांची रेडिओथेरपी ३० वेळा करण्यात आली. प्रदीर्घ उपचारानंतर अखेर त्यांची ब्रेन ट्युमरपासून मुक्तता झाली. उपचारापूर्वी ते धावू शकत नव्हते, मात्र आता त्यांचे वजन नियंत्रणात आल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्य