शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

झोपेच्या गोळ्या घेत असाल तर 'या' समस्यांचा सामना करण्यासाठी तयार रहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 13:21 IST

बऱ्याच जणांना झोपेसंदर्भातील अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. त्यावेळी काही लोक डॉक्टरांच्या सल्यानुसार झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतात. परंतु काही लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता, गरज नसतानाही झोपेच्या गोळ्या घेत असतात.

बऱ्याच जणांना झोपेसंदर्भातील अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. त्यावेळी काही लोक डॉक्टरांच्या सल्यानुसार झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतात. परंतु काही लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता, गरज नसतानाही झोपेच्या गोळ्या घेत असतात. झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे अनेकदा शांत झोप लागते, हे खरं आहे. पण कालांतराने या गोळ्यांची सवय लागते. एकदा का ही सवय लागली की हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरते. झोपेच्या गोळ्यांचं अधिक सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया झोपेच्या गोळ्यांच्या सेवनाने होणाऱ्या आजारांबाबत...

गरोदरपणात सेवन करणं टाळावं

गर्भवती महिलांनी झोपेच्या गोळ्यांच सेवन करणं टाळावं. यामुळे अस्वस्थ वाटू लागतं आणि पोटातील बाळावर याचा वाईट परिणाम होतो. गरोदरपणात झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.  

हृदयासंबंधीच्या आजारांना आमंत्रण 

डॉक्टरांच्या मते, झोपेच्या गोळ्यांचे जास्त सेवन केल्याने हार्ट अटॅकचा धोका संभवतो. वैज्ञानिकांनी झोपेच्या औषधांमध्ये अस्तित्वात असणाऱ्या जोपिडेम नावाच्या तत्वाला हृदयासंबंधिचे आजार होण्याचं कारण सांगितलं आहे. 

कोमामध्ये जाण्याचा धोका

ज्या व्यक्ती दररोज एका गोळीपेक्षा जास्त गोळ्या घेत असतात, अशा व्यक्तींना कोमामध्ये जाण्याचा धोका अधिक संभवतो. दमा आणि पाठीच्या मणक्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना इतर व्यक्तींच्या तुलनेत हा धोका जास्त असतो. तसेच झोपेच्या गोळ्यांमुळे ब्लड प्रेशर, डोकोदुखी यांसारख्या तक्रारींनाही सामोरं जावं लागतं. 

स्मरणशक्तीवर परिणाम

अनेक दिवसांपासून झोपेच्या गोळ्या घेणाऱ्या व्यक्तींच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो.  झोपोच्या गोळ्यांमध्ये असेलेली तत्व नर्वस सिस्टिमवर परिणाम करतात. त्यामुळे नर्वस सिस्टिम संबंधातील आजारांचा धोका संभवतो. 

थकवा जाणवणं

दररोज झोपेच्या गोळ्या खाल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्याचप्रमाणे दिवसभर सुस्ती, थकवा जाणवतो. 

लठ्ठ व्यक्तींना सर्वाधिक धोका

ज्या व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त असतात. असा व्यक्तींनी चुकूनही झोपोच्या गोळ्या घेऊ नयेत. अशा व्यक्तींना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य