दूध बनवा अधिक टेस्टी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 17:00 IST
दुधात असलेल्या पौष्टिक गुणधर्मामुळे दुधाला पूर्ण अन्न म्हटले जाते. दुधाचे रोज सेवन केल्याने आपली हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. मात्र, बरेचजण दूध पिताना नाक मुरडतात.
दूध बनवा अधिक टेस्टी !
दुधात असलेल्या पौष्टिक गुणधर्मामुळे दुधाला पूर्ण अन्न म्हटले जाते. दुधाचे रोज सेवन केल्याने आपली हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. मात्र, बरेचजण दूध पिताना नाक मुरडतात. पण त्यात फ्लेवर्स किंवा बर्फाचे तुकडे टाकले तर तेच दूध आकर्षक व टेस्टी बनू शकते. आहारतज्ज्ञांच्या मते दुधात फ्रुटी, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, वॅनिला, कॅरमेल, रोज, पॅन आदी फ्लेवर्सचा वापर करुन दूध टेस्टी बनवू शकता. शिवाय अजून हेल्दी बनविण्यासाठी वेलची, कलमी, जायफळ, हळद, मध इत्यादी वापरू शकता. मिल्क शेकमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. शेकमधील कर्बोदके ऊर्जा देतात. मिल्क शेकमधील फळे, विटॅमिन व फायबरचा उत्तम स्त्रोत आहेत. दुधात तुमच्या आवडीनुसार खाण्याचे रंगही टाकू शकता. दूध पाहून नाक मुरडणाऱ्यासाठी दुधात रंगीत बर्फाचे खडे टाकणे हा उत्तम पर्याय आहे. रंगीत बर्फ बनविताना पाण्यात एक थेंब खाण्याचा रंग टाका. रंगीत बर्फाचा खडा तयार होईल. सुका मेवा प्रथिने, फायबर, अँटी आॅक्सिडंट, मिनरल्सचा खजिना आहे. दुधात सुकामेवा मिक्स केल्यास वेगळी चव तर मिळेलच शिवाय आरोग्य देखील हेल्दी राहील.