शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सिगारेट न ओढणाऱ्यांमध्येही वेगानं वाढत आहे लंग कॅन्सरच्या केसेस, वैज्ञानिक चिंतेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:08 IST

Lung Cancer : रिसर्चनुसार, ज्या रूग्णांनी कधीच धुम्रपान केलं नाही, त्यांना फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याच्या केसेस वाढत आहेत.

Lung Cancer : सामान्यपणे असं मानलं जातं की, सिगारेट किंवा विडी ओढणाऱ्यांना फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका असतो. पण आता जर तुम्ही सिगारेट किंवा विडी ओढत नसाल तरीही तुम्हाला फुप्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. वायु प्रदूषण याचं कारण ठरत आहे. लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, धुम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये ज्या कॅन्सरच्या केसेस वाढत आहेत. रिसर्चनुसार, ज्या रूग्णांनी कधीच धुम्रपान केलं नाही, त्यांना फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याच्या केसेस वाढत आहेत.

लॅन्सेटचा हा रिसर्च इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिकांनी केला. स्टडी दरम्यान ग्लोबल कॅन्सर ऑब्जर्वेटरी २०२२ च्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. ज्यात आढळून आलं की, जे लोक धुम्रपान करत नाही, त्यांच्यात एडेनोकार्सिनोमा नावाचा कॅन्सर सगळ्यात जास्त आढळत आहे. हा लंग कॅन्सरचा एक प्रकार आहे.

एडेनोकार्सिनोमा असा कॅन्सर आहे, जो अशा ग्लॅंडमध्ये विकसित होतो जे शरीरात कफ आणि पचनासाठीचे तरल पदार्थ बनवतात. रिसर्चचं मत आहे की, या कॅन्सरचा संबंध धुम्रपान करणाऱ्या लोकांशी कमी आहे. पण वायु प्रदूषण याचं मोठं कारण आहे.

रिसर्चमधून समोर आलं की, २०२२ मध्ये जगभरात जेवढ्या कॅन्सरच्या केसेस समोर आल्या होत्या, त्यात ५३-७० टक्के असे लोक होते, ज्यांनी कधीच धुम्रपान केलं नाही. लॅन्सेटच्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, लंग कॅन्सरनं होणाऱ्या एकूण मृत्यूंमध्ये धुम्रपान न करणाऱ्यांचं स्थान पाचवं आहे. आशियाई देशात ही समस्या वेगानं वाढत आहे. महिला सगळ्यात जास्त प्रभावित होत आहेत. २०२२ मध्ये साधारण ८० हजार महिला ज्यांना लंग कॅन्सर होता, त्यांचा थेट संबंध वायु प्रदूषणासोबत आढळून आलं.

वैज्ञानिकांचं मत आहे की, लंग कॅन्सरच्या वाढत्या केसेससाठी वायु प्रदूषण मुख्य कारण आहे. खासकरून पीएम २.५ सारखे घातक कण फुप्फुसांमध्ये जाऊन खोलवर सेल्सचं नुकसान करतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

आयएआरसी वैज्ञानिक फ्रेडी ब्रे यांनी सांगितलं की, 'आज लंग कॅन्सरच्या ज्या केसेस वाढत आहेत, त्याचं मुख्य कारण धुम्रपानाच्या बदलत्या सवयी आणि वायु प्रदूषण आहे. जर स्थितीपासून बचाव करायचा असेल तर सरकारनं तंबाखू नियंत्रण आणि वायु प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी योजना केल्या पाहिजे.

टॅग्स :cancerकर्करोगHealth Tipsहेल्थ टिप्स