शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर काय होतं हे तुम्हाला माहीत आहेच, आता कमी झाल्यावर काय होतं ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 17:20 IST

Cholesterol : शरीर योग्यप्रकारे काम करण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल कमी झाल्यासही वेगवेगळ्या समस्या होतात.

Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढलं तर किती समस्या होतात हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. पण तेच कमी झालं तरीही मोठा धोका आहे. कोलेस्ट्रॉल मेणासारखा एक पदार्थ असतो. जे आपल्या शरीरातील पेशी आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी महत्त्वाचं असतं. त्यासोबतच शरीर योग्यप्रकारे काम करण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल कमी झाल्यासही वेगवेगळ्या समस्या होतात.

कोलेस्ट्रॉल स्तर वाढल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्ट अटॅक आणि हृदयाचे इतर आजार. जेव्हा आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, आपलं शरीर काही संकेत देतं. हे संकेत समजून घेऊन वेळीच ब्लड टेस्ट करावी आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून सुटका मिळवावी. 

काय होईल समस्या?

कोलेस्ट्रॉलचा थेट संबंध हा हृदयाशी असतो. पण एका नव्या रिसर्चमधून हे समोर आले आहे की, जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकच कमी झालं तर याने हॅमरेजिक स्ट्रोक म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्त्रावाचा आघात होण्याचा धोका वाढतो. 

एका रिसर्चनुसार, कोलेस्ट्रॉल फारच कमी झालं तर हॅमेरेजिक स्ट्रोकचा धोका १६९ टक्के अधिक होतो. अमेरिकेत जास्तीत जास्त मृत्यूचं मुख्य कारण हृदयासंबंधी आजार आहे. केवळ अमेरिकेतच नाही तर भारतातही हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या कमी नाही. दरवर्षी अनेक लोकांचा जीव वेगवेगळ्या हृदयरोगांमुळे जातो.

या रिसर्चमध्ये ९६, ०४३ लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यांना ना कधी हार्ट अटॅक आला ना कधी स्ट्रोकची ना कॅन्सर होता. रिसर्च सुरू करण्यापूर्वी या लोकांचं एलडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण मोजण्यात आलं. त्यानंतर सलग ९ वर्षे या लोकांचं कोलेस्ट्रॉल मोजण्यात आलं. अभ्यासकांनुसार, या रिसर्चच्या परिणामांमधून कोलेस्ट्रॉल, हृदयरोग आणि हॅमरेजच्या केसेससोबत निपटण्यास चांगलीच मदत झाली.

कोलेस्ट्रॉल कसा कराल मॅनेज?

- अनेकांना जंक फूड आवडतं. मात्र यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.

- कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भाज्यांमध्ये कमी तेल वापरा.

- उकडलेल्या भाजा खाल्ल्यास ते जास्त उत्तम. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील.

- चहा, कॉफी, मिल्क शेक प्या. त्यासाठी लो फॅट असलेलं दूध वापरा. क्रीम आणि प्रक्रिया केलेली डेअरी उत्पादनं टाळा.

- कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य