Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाने तब्बल ४७ वेळा बदललं रूप, तिसरी लाट ठरेल अधिक घातक?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 11:07 AM2021-06-08T11:07:47+5:302021-06-08T11:10:03+5:30

एकट्या महाराष्ट्रावर करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, तीन महिन्यादरम्यान वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांमध्ये नवनवीन व्हेरिएंट आढळून आले.

Lots of new coronavirus variants found in Maharashtra during last three months, the third wave will be fatal | Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाने तब्बल ४७ वेळा बदललं रूप, तिसरी लाट ठरेल अधिक घातक?

Coronavirus : महाराष्ट्रात कोरोनाने तब्बल ४७ वेळा बदललं रूप, तिसरी लाट ठरेल अधिक घातक?

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या म्यूटेशनबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. वैज्ञानिकांना आढळून आलं की, देशातील एकाच राज्यात कोरोना व्हायरसने तब्बल ४७ वेळा आपलं रूप बदललं आहे. इतर राज्यांची स्थिती यापेक्षा गंभीर होऊ शकते. वैज्ञानिक म्हणाले की, जर आता खास काळजी घेतली गेली नाही तर तिसरी लाट जास्त घातक ठरू शकते. कारण व्हायरसमध्ये म्यूटेशन वेगाने होत आहे.

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, एकट्या महाराष्ट्रावर करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, तीन महिन्यादरम्यान वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांमध्ये नवनवीन व्हेरिएंट आढळून आले. वैज्ञानिकांचा असा अंदाज आहे की प्लाज्मा, रेमडेसिविर आणि स्टेरॉइडसारख्या औषधांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या वापरामुळे म्यूटेशन वाढण्याला प्रोत्साहन मिळालं. त्यामुळेच इतर राज्यांमध्येही सिक्वेसिंह वाढवण्याची गरज आहे. (हे पण वाचा : Corona Virus : कोरोना प्राणघातक नाही; पण आहे धूर्त, होतो वेगाने संसर्ग : डॉ. अरोरा)

पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉयरोलॉजी, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आणि नवी दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये जिल्हावार स्थितीचा समावेश करण्यात आला होता. कारण देशात सर्वात जास्त कोरोना संक्रमणाचा प्रभाव गेल्या एक वर्षात याच जिल्ह्यात होता. एआयवीच्या डॉ. प्रज्ञा यादव यांनी सांगितले की, महाराष्ट्रात गेल्या फेब्रुवारी महिन्यापासूनच व्हायरसच्या म्यूटेशन जास्त बघायला मिळालं. एका-एका म्यूटेशनबाबत माहिती घेतली जात आहे.

यातील अनेक म्यूटेशनबाबत आम्हाला आधीच माहिती देण्यात आली होती. त्या म्हणाल्या की, व्हायरसमध्ये सतत होत असलेलं म्यूटेशन आणि संक्रमण वाढण्याने एका गंभीर स्थितीचा अंदाज घेतला जाऊ शकतो. तेच एनसीडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बी. 1.617 व्हेरिएंट आतापर्यंत ५४ देशांमध्ये आढळून आला आहे. याच्याच एका म्यूटेशनला डेल्टा व्हेरिएंट हे नाव WHO ने दिलं. (हे पण वााचा : कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांमध्ये दिसतील ही लक्षणे, तर वेळीच व्हा सावध; फेल होऊ शकतात ऑर्गन)

काय सांगतो रिसर्च?

यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात महाराष्ट्रात झाली होती. इथे जानेवारी महिन्यातच अनेक जिल्ह्यांमध्ये संक्रमणाच्या केसेस वाढल्या होत्या. नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ७३३ सॅम्पल एकत्र करून जीनोम सिक्वेसिंग केली गेली. जेणेकरून हे कळावं की, व्हायरस कोणत्या व्हेरिएंटने पसरत आहे. वैज्ञानिक हैराण झाले जेव्हा त्यांना एकापाठी एका सॅम्पलमध्ये ४७ वेळा व्हायरसचं म्यूटेशन दिसलं. याआधी देशात कधीच असं बघायला मिळालं नव्हतं. ७३३ पैकी ५९८ सॅम्पलच्या सिक्वेसिंगमध्ये जेव्हा वैज्ञानिकांनी यश मिळालं तर समोर आलं की, यात डेल्टा व्हेरिएंटशिवायही बरेच व्हेरिएंट महाराष्ट्रातील लोकांमध्ये पसरत आहे.

रिसर्चमधून समोर आलं की, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये कोरोना व्हायरसचे अनेक वंश फिरत आहेत. तर पूर्व महाराष्ट्रात बी.1.617 व्हायरसचे वंश जास्त आढळून आले. पुणे, ठाणे, औरंगाबादसहीत पश्चिम राज्यात डेल्टा व्हेरिएंट वेगवेगळे म्यूटेशन आढळून आले. 
 

Web Title: Lots of new coronavirus variants found in Maharashtra during last three months, the third wave will be fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.