शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'या' ९ कारणांमुळे दर महिन्याला पाळी यायला होतो उशीर; चांगल्या आरोग्यासाठी वेळीच माहीत करून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 12:14 IST

Health Tips in Marathi : जर तुम्ही गर्भधारणेसाठी कोणतंही प्लॅनिंग करत नसाल तरीही इतर काही कारणांमुळे मासिक पाळी येण्यास उशिर होऊ शकतो.

सर्वाधिक महिलांना मासिक पाळीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. पाळी न येण्याचे सगळ्यात मोठं कारण गर्भधारणा हे असते. पण जर तुम्ही गर्भधारणेसाठी कोणतंही प्लॅनिंग करत नसाल तरीही इतर काही कारणांमुळे मासिक पाळी येण्यास उशिर होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला ९ कारणं सांगणार आहोत ज्यामुळे पाळी यायला उशिर होतो.

ताण तणाव

ताणतणावाचा वेगवेगळ्या प्रकारे शरीरावर परिणाम होतो. ताण तणावामुळे-GnRH नावाचे हार्मोनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ओव्यूलेशन उशीरा सुरू होऊन पाळी उशीरा येते. तुमच्या आयुष्यात जास्त जाण तणाव असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

आजारपण

अचानक ताप, सर्दी, खोकला येणं किंवा कोणत्याही दीर्घ आजारामुळे पीरियड्स देखील लांबू शकतात. हे तात्पुरते होते आणि एकदा आपण रोगातून बरे झाल्यावर आपली पाळी वेळेवर यायला सुरूवात होते. 

दिनक्रमात बदल

वेळापत्रक बदलणे, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे, शहरातून बाहेर जाणं किंवा लग्नासाठी किंवा इतर फंक्शनसाठी आपली दिनचर्या बदलते. त्यामुळे मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होऊन पाळी उशिरा येण्याची शक्यता असते.

ब्रेस्टफीडिंग 

अनेक महिला जोपर्यंत बाळाचे स्तनपान करत असतात. तोपर्यंत त्यांना नियमित पाळी येत नाही. 

बर्थ कंट्रोल पिल्स

बर्थ कंट्रोल पिल्स किंवा अन्य काही औषधांमुळे मासिक पाळीची सायकल बदलते. अशी औषधं घेतल्यामुळे पाळी वेळेवर येत नाही किंवा जास्त लवकर येते अनेकदा दोन ते तीन महिने वाट पाहावी लागू शकते. अशा स्थितीत तुम्ही योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचे ठरेल.

लठ्ठपणा

लठ्ठपणा हे मासिक पाळी न येण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण आहे. महिलांना पाळी दर महिन्याला तारखेला येते. पण अचानक ३ ते ४ किलोंनी वजन वाढलं तर हार्मोनल बदलांचा सामना करावा लागू शकतो  त्यामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही. त्यासाठी रोज व्यायम करणं फायदेशीर ठरेल. शारीरिक हालचाल केल्यास, भरपूर पाणी पिल्यास शरीर निरोगी राहते. परिणामी पाळी वेळेवर येते.

हिवाळ्यात होणारा अंगदुखीचा त्रास असू शकतं कोरोनाचं लक्षणं? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

प्री मेनोपॉज

वयाच्या ३५ आणि ४० वर्षानंतर ही समस्या उद्भवू शकते. मासिक पाळी येणं थांबण्याआधी अनेक महिने पाळी अनियमित व्हायला सुरूवात होते. 

वजन जास्त कमी होणं

जर तुमच्या शरीराला आवश्यक असणारे फॅट्स योग्य प्रमाणात नसतील तर अनियमित होऊ शकते. शरीराला पोषक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास मासिक पाळीच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. 

'या' लोकांना सगळ्यात जास्त असतो मुत्राशयाच्या कॅन्सरचा धोका; जाणून घ्या प्रकार

थायरॉईड

गळ्यातील थायरॉईड ग्रंथी चयापचय नियंत्रित करते. शरीराच्या अनेक फंक्शन्समध्येही याची भूमिका महत्वाची असते. आपल्याला थायरॉईड संबंधित कोणतीही समस्या असल्यास मासिक पाळीवर देखील परिणाम होतो. आपल्याला थायरॉईडची समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्या.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWomenमहिला