शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूत एक खास प्रोटीन कमी असल्याने वाढतो लठ्ठपणा - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 16:40 IST

Health Tips : आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की, लठ्ठपणाचा संबंध भूकेशी असतो. ज्या व्यक्तीला जेवढी भूक लागते, तो तेवढं खातो. मग त्याचमुळे ते नंतर लठ्ठपणाचे शिकार होतात. 

आजकाल लठ्ठपणा  एक आजार नाही तर आजारांचं हेडक्वार्टर आहे. लठ्ठपणा शरीरात डायबिटीस, हायपरटेंशन, हार्ट डिजीज, बॅड कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्या निर्माण करतो. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की, लठ्ठपणाचा संबंध भूकेशी असतो. ज्या व्यक्तीला जेवढी भूक लागते, तो तेवढं खातो. मग त्याचमुळे ते नंतर लठ्ठपणाचे शिकार होतात. 

मात्र, दैनिक जागरणमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, जपानच्या वैज्ञानिकांनी अशा प्रोटीनचा शोध घेतला आहे, जो मेंदूत भूकेसंबंधी नियमित संकेत देणे आणि मेटाबॉलिज्ममध्ये महत्वाची भूमिका बजावतो.उंदरांवर करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये आढळून आलं की, मेंदूच्या पुढच्या भागात एक्सआरएन१ नावाचं प्रोटीन कमी असल्याने उंदारांची भूक वाढली आणि ते लठ्ठ होतात.

जपानची ओआयएसटी म्हणजे ओकीनावा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट यूनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक प्रोफेसर तदाशी यामामोटो यांच्यानुसार, मूलभूतपणे लठ्ठ होण्याचं कारण जेवण करणे आणि त्यापासून उत्पन्न ऊर्जेच्या असंतुलनामुळे असतं. हा रिसर्च सायन्स मॅगझिन आयसायन्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

सध्याच्या  काळात लठ्ठपणा पब्लिक हेल्थसाठी चिंतेचं एक मोठं कारण आहे. जगभरात ६५ कोटींपेक्षा अधिक वयस्क लोक लठ्ठपणाचे शिकार आहेत. वजन अत्याधिक वाढल्याने त्यासंबंधी अनेक आजार महामारीचं रूप घेतात. जसे टाइप-२ डायबिटीस इत्यादी.

रिसर्चमध्ये आढळून आलं की, उंदराच्या मेंदूच्या पुढच्या भागात न्यूरॉनची कमतरता केली तर त्यांच्या मेंदूच्या या भागात एक्सआरएन१ नावाचं प्रोटीन कमी होतं. याने शरीराचं तापमान, झोप, भूक आणि तहान नियंत्रित केली जाऊ शकते. ज्या उंदरांमध्ये हे प्रोटीन कमी आढळून आलं, त्यांनी सामान्य उंदरांच्या तुलनेत जास्त जेवण केलं. 

टॅग्स :Healthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सResearchसंशोधन