शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 17:44 IST

शास्त्रज्ञांनी 2,517 महिलांवर हे संशोधन केलं.

पुरेशी झोप न घेतल्यास आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एका नवीन रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की, जर महिलांना पुरेशी झोप मिळत नसेल आणि हे अनेक दिवस चालू राहिलं तर त्यांना हृदयाशी संबंधित आजार सहज होऊ शकतात. महिलांना कमी झोपण्याची सवय महागात पडू शकते. 

पिट्सबर्ग विद्यापीठात झालेल्या या संशोधनात असंही आढळून आलं आहे की, जर एखादी महिला रात्री सात तास झोपली नाही तर ती हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन यासारख्या समस्यांना बळी पडू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये हा धोका 70 टक्क्यांनी वाढतो.

शास्त्रज्ञांनी 2,517 महिलांवर हे संशोधन केलं. या संशोधनात असं आढळून आलं की ज्या स्त्रिया झोपेचा अभाव किंवा वारंवार झोपेचा त्रास सहन करत आहेत त्यांना हृदयविकार होण्याचा धोका 70 टक्के आहे. त्याच वेळी, 5 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या महिलांमध्ये 72 टक्के हार्ट अटॅक, स्ट्रोक, हार्ट फेलियर, आर्टरी डिजीज अशा समस्या आढळून आल्या आहेत. 

संशोधनात असंही आढळून आलं आहे की ज्या महिलांना सतत निद्रानाशाचा त्रास होतो त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं आणि यामुळे बॉडी रिदमवरही परिणाम होतो, ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका 75 टक्क्यांनी वाढतो.

निद्रानाशाच्या समस्येपासून असं राहा दूर 

- हेल्थलाइननुसार शरीर आणि मन शांत करण्यासाठी मेडिटेशन, मंत्र आणि योगाची मदत घ्या.- आठवड्यातून 150 मिनिटं व्यायाम केल्यास निद्रानाशाची समस्या दूर होऊ लागते.- जर तुम्हाला तणावामुळे झोप येत नसेल तर सेल्फ मसाजच्या मदतीने तुम्ही या समस्येवर मात करू शकता.- तुमच्या आहारात मॅग्नेशियम युक्त अन्नाचा समावेश करा.- रात्रीचं जेवण झोपण्याच्या दोन तास आधी करा. - चहा-कॉफीपासून दूर राहा.- झोपण्याच्या दोन तास आधी स्क्रीन बंद करा.- कोमट पाण्याने आंघोळ करा आणि झोपा. खोलीतील लाइट बंद करा. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealthआरोग्यWomenमहिला