शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

मोठी माणसं सांगतात रात्रीच्यावेळी नखं कापू नयेत, जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 18:57 IST

नखं कापण्याची योग्य पद्धत आणि वेळही जाणून (Do not cut your nails at night) घेऊ.

घरातील वडीलधारी मंडळी रात्री नखं कापू नयेत (not cut nails), असं सांगत असतात. रात्री नखं का कापू नयेत? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. पण या प्रश्नाचं योग्य उत्तर फारच कमी लोकांना माहीत असतं. चला, या प्रश्नाच्या नेमक्या उत्तरासह नखं कापण्याची योग्य पद्धत आणि वेळही जाणून (Do not cut your nails at night) घेऊ.

नखं कापण्याची योग्य वेळ कोणती?अमेरिकन अ‌ॅकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशनच्या मते, मानवी नखं केरॅटिनपासून बनलेली असतात. म्हणूनच, आंघोळ केल्यावर नखं कापणं सर्वोत्तम मानलं जातं. कारण, नखं पाण्यात किंवा साबणाच्या पाण्यात भिजल्यानं अगदी सहज कापली जातात. पण रात्रीच्या वेळी जेव्हा आपण ती कापतो, तेव्हा ती बराच काळ पाण्याच्या संपर्कात न आलेली नसतात. त्यामुळं त्यांना कापणं कठीण होतं. त्यामुळं कधी कधी नखं कापताना काही त्रास होतो आणि ती खराब होण्याचा धोकाही वाढतो.

रात्री नखं न कापण्यामागचं आणखी एक कारणरात्री नखं कापू नयेत, या सल्ल्यामागील आणखी एक कारण म्हणजे जुन्या काळी लोकांकडे नेल कटर उपलब्ध नव्हती. त्या काळी लोक चाकूनं किंवा धारदार हत्यारानं नखं कापत असत. त्यावेळी वीज नव्हती. म्हणूनच पूर्वी लोक रात्रीच्या अंधारात नखं कापण्यास मनाई करत असत. परंतु, काळाच्या ओघात लोकांनी त्याला अंधश्रद्धेशी जोडलं आहे. काही लोक अजूनही त्यावर विश्वास ठेवतात आणि आपल्या मुलांनाही ते पाळण्यास सांगतात, जेणेकरून कोणत्याही प्रकारची शारीरिक हानी टाळता येईल.

नखं कापण्यापूर्वी थोडी ओलसर करानखे कापण्याचा योग्य मार्ग म्हणजे नखं आधी थोड्याशा तेलानं किंवा पाण्यात ओलसर करणं. यामुळं तुमची नखं मऊ होतील आणि तुम्ही त्यांना व्यवस्थित कापू शकाल. लक्षात ठेवा की, नखं कापल्यानंतर त्यांना मॉइश्चराइझ नक्की करा. तसंच, नखे कापल्यानंतर हात धुवा. नंतर ते कोरडे होऊ द्या आणि त्यानंतर मॉइश्चरायझर किंवा तेल लावा. यामुळं नखं नेहमीच सुंदर राहतील.

कुठेही बसून नखं कापू नकाअनेकदा लोक त्यांच्या सोयीनुसार कुठंही बसून नखं कापू लागतात. ही खूप वाईट सवय आहे. नखं कापण्यासाठी बोर्डचा वापर करा किंवा सपाट आणि मजबूत पृष्ठभागावर हात ठेवून सावकाशपणे नखं कापा. नखं कापून झाल्यानंतर तो बोर्ड उचला आणि नखं डस्टबिनमध्ये टाका. कपडे किंवा फर्निचरसारख्या वस्तूंवर कधीही नखं कापू नका.

क्युटिकल्स कापू नकाक्युटिकल्स (Cuticles) नखांच्या मुळांचं संरक्षण करतात. पण जेव्हा तुम्ही तुमची क्यूटिकल कापता, तेव्हा बॅक्टेरिया आणि इतर जंतू शरीरात प्रवेश करू लागतात. यामुळं, नखामध्ये संसर्ग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो, जो काहीवेळा बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो. म्हणून, तुमच्या क्युटिकल्स कापणं किंवा त्यांना आणखी मागेपर्यंत नेणं टाळा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स