शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

झोपेतून उठल्या उठल्या फोन बघत असाल तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:02 IST

एका रिसर्चनुसार, सकाळी उठल्यावर पहिल्या 15 मिनिटात 5 लोकांपैकी 4 लोक मोबाइल फोन चेक करतात.

मोबाइल फोनचा वापर जीवनाचा मोठा भाग झाला आहे. इतका की, काही लोक सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल फोन चेक करतात. पण खरंच सकाळी झोपेतून उठल्या बरोबर मोबाइल चेक करणं किती योग्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडायला हवा. एका रिसर्चनुसार, सकाळी उठल्यावर पहिल्या 15 मिनिटात 5 लोकांपैकी 4 लोक मोबाइल फोन चेक करतात. जर तुम्हीही असं करत असाल तर याच्या नुकसानाबाबत तुम्हाला माहीत असायला हवं.

मेंदू आणि मनाच्या शांतीवर प्रभाव

जे लोक सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल चेक करत असतील तर याचा त्यांच्या मेंदूवर थेट परिणाम होतो. याने मनाची शांतता सुद्धा बाधित होते. व्यक्ती मोबाइल फोन स्क्रोलसोबत मेंदूवरही जोर देतो यानेही असं होत असल्याचं एक्सपर्ट सांगतात. कालच्या आणि आजच्या शेड्युलवर मेंदू वेगवेगळे व्यवहार करतो. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टचा देखील मेंदू आणि मनावर प्रभाव पडतो. सकाळी उठताच मोबाइल चेक केल्याने तणाव आणि चिंता वाढते. असं ई-मेल, रिमाइंडर आणि इन्स्टाग्राम पोस्टसहीत इतरही सोशल साइट्सवरील मित्रांच्या पोस्टमुळेही होऊ शकतं. 

स्वभावात बदल

जर तुम्ही सकाळी उठताच मोबाइल फोन चेक करत असाल तर तुमच्या स्वभावातही बदल येऊ शकतो. काही लोकांमध्ये चिडचिडपणाचं हे कारण असतं. काही लोकांना FOMO नावाची समस्याही होऊ लागते. याचं मुख्य लक्षण आपण कुठेतरी, काहीतरी हरवत चालल्याची भिती हे असतं. ही एक भावनात्मक गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा राग किंवा संताप येणे यांसारख्या समस्याही होतात.

खाण्याच्या सवयीत बदल

अनेकदा असं पाहिलं जातं की, सकाळी उठल्यावर लगेच जे लोक फोन चेक करतात, त्यांच्या खाण्याच्या व्यवहारातही बदल होऊ लागतो. फोन चेक केल्याने या लोकांचा व्यवहार इतर लोकांच्या तुलनेत वेगळा असतो. सकाळी उठल्यावर हे लोक फिरायला जातात तेव्हा त्यांना अधिक थकवा जाणवतो.

फोकस न करता येणे 

जे लोक सकाळी उठून मोबाइल चेक करतात, त्यांचं लक्ष केंद्रीत राहत नाही. जास्तवेळ लोक फोनमधे गुंतलेले असतात आणि आपल्या कामावर लक्ष देत नाहीत. त्यांचं कामात लक्षही लागत नाही. यामुळेच त्यांची कार्यक्षमताही कमी होऊ लागते.

कशी बदलाल ही सवय?

सकाळी उठल्यानंतर फोन चेक करण्याऐवजी इतर गरजेची कामं करावीत. जसे तुम्ही कोमट पाणी सेवन करून फ्रेश होण्यासाठी तयारी करू शकतात.

जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर सकाळी उठून मेडिटेशन आणि योगाभ्यास करा.

परिवारातील सदस्यांसोबत चहा घ्या, त्यांच्यासोबत गप्पा करा.

रात्री झोपताना फोन सायलेन्ट करा किंवा इंटरनेट बंद करा.

रोज सकाळी तुमची सगळी तयारी केल्यानंतर फोन हाती घ्यावा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य