शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

निद्रानाशापेक्षाही भयंकर आहे झोपेची 'ही' समस्या; वेळीच उपचार न घेतल्यास आयुष्यभराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:20 IST

स्लीप एपनिया’बद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. ‘स्लीप एपनिया’ म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या झोपेचा थेट आरोग्याशी संबंध असतो. असे म्हणतात की, चांगली झोप आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनवते. परंतु, आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि तणावामुळे, फार कमी लोक शांतपणे झोप घेऊ शकतात. कमी झोप मिळाली असता चिडचिडेपण वाढतो. परंतु, इतर कोणत्याही कारणास्तव जर आपल्याला पुरेशी झोप मिळत नसेल तर, आपल्या शारीरिक समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. शरीराला पुरेशी झोप न मिळाल्यामुळे बरेच लोक स्लीपिंग डिसऑर्डरला बळी पडतात. सुरुवातीला याचा अंदाज येत नाही. परंतु, नंतर त्याचे फार गंभीर परिणाम होऊ शकतात.

झोपेच्या कमतरतेमुळे, निद्रानाश आणि नार्कोलेप्सी सारख्या समस्या उद्भवतात. याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असते. परंतु, ‘स्लीप एपनिया’बद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. ‘स्लीप एपनिया’ म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

स्लीप एपनिया म्हणजे काय?स्लीप एपनिया एक प्रकारचा झोपेचा विकार आहे. ज्यामध्ये झोपेच्या दरम्यान श्वास घेण्यास त्रास होतो. स्लीप एपनियामुळे आपण काही सेकंद श्वास घेऊ शकत नाही. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की, रात्री झोपेच्या दरम्यान श्वसनक्रियेत अनेकदा अडथळा उद्भवू शकतो. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि झोप मोड होते. ज्यामुळे निद्रानाशाची शक्यता असते. सकाळी डोके दुखणे, थकवा, मूड स्विंग आणि नैराश्य ही स्लीप एपनियाची लक्षणे आहेत.

स्लीप एपनियाचा आपल्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, स्लीप एपनिया आपल्या झोपेवर परिणाम करतो, ज्यामुळे रात्री सतत जाग येते. 8 तासांची झोप घेतल्यानंतरही बर्‍याच वेळा आपल्याला थकल्यासारखे वाटते. जॉर्जिया येथील ऑगस्टा युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार मानसिक ताणतणाव झोपेत व्यत्यय आणण्याचे मुख्य कारण ठरते. संशोधनात असेही समोर आले आहे की, बहुतेक रुग्ण कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील आहेत, जे एकटे राहतात आणि ज्यांना सामाजिकपातळीवरही कमी लेखले गेलेले असते. झोपेच्या अभावामुळे ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनियाग्रस्त लोकांमध्ये चिडचिडेपणा, मूड स्विंगसारख्या समस्या उद्भवतात.

स्लीप एपनियावर उपचार काय?आपल्याला जर स्लीप एपनियाची लक्षणे जाणवत असतील, तर आपल्या डॉक्टरांशी बोला. डॉक्टर तुमची स्लीपिंग पॅटर्न तापासतील. त्याचबरोबर झोपेच्या दरम्यान ऑक्सिजन तपासणी म्हणजेच सीपीएसी थेरपी दिली जाईल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स