शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

त्वचा रोगासह ताण-तणावाचं कारण ठरू शकतो सोरायसिस, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 1:28 PM

ताणतणावाचा प्रचंड नकारात्मक परिणाम आपल्या सर्वांगीण आरोग्यावर होत असतो.

ताणतणावाचा प्रचंड नकारात्मक परिणाम आपल्या सर्वांगीण आरोग्यावर होत असतो. याचेच एक उदाहरण म्हणजे ‘सोरायसिस. सोरायसिसमध्ये  रुग्णाच्या अंगावर सर्व ठिकाणी लाल ,जाड, खाजणारे ठिपके येतात. सोरायसिस आणि तणाव यांच्यात थेट संबंध असतो. सोरायसिस हा रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार आहे. तणावामुळे रोगप्रतिकारकतेवर विपरित परिणाम होऊ शकतो. जर रुग्णांना हा ताण-तणाव आणि सोरायसिसदरम्यानचा संबंध वेळीच लक्षात आला, तर ते तणाव कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलू शकतील आणि त्याद्वारे त्यांना सोरायसिसमुक्त होण्यास निश्चित मदत होईल.

या आजाराबद्दल माहिती ही त्वचाविज्ञान प्राध्यापक डॉ. किरण गोडसे यांनी दिली आहे. डॉ. किरण गोडसे अपोलो हॉस्पिटल व फोर्टिस हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या नेरूळ येथील डी वाय पाटील विद्यापीठातील प्राध्यापक आहेत. सोरायसिस शरीराच्या सांध्यांवरही परिणाम करू शकतो आणि यामुळे लोकांना चालता-फिरताना त्रास होतो तसेच काही प्रमाणात अपंगत्वदेखील येऊ शकते. सोरायसिसच्या रूग्णांमध्ये हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या अनेक गंभीर परिस्थितींचा धोका जास्त असतो. ( हे पण वाचा-थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे वाचाल तर हिवाळ्यातही गरम पाण्याने आंघोळ करणे सोडाल!)

सोरायसिस असलेल्या बर्‍याच लोकांना  हे खाजणारे ठिपके कायमचे येत नाहीत. ते अधून-मधून येत राहतात. यासाठी तणाव हे एक सामान्य लक्षण आहे आणि अशा तणावाखाली असतानाच रुग्णांना अनेकदा सोरायसिसचा त्रास होतो. आयुष्यात एखादी भीषण घटना घडून गेल्याच्या वर्षभरातच अनेक रुग्णांना सोरायसिसचा त्रास उद्भवतो. 

सोरायसिसमुळे येऊ शकतो ताण-तणाव

तणाव आणि सोरायसिसमधील दुवा एखाद्या दुष्टचक्रासारखा आहे. तणावामुळे सोरायसिस गंभीर होऊ शकतो. उपचारासाठी लागणारा खर्च, रोगाच्या वेदनांसह जगण्याचे ओझे, सततची अस्वस्थता,आणि रोगाचा कलंक या बाबी या आजाराशी संबंधित जोडलेल्या नकारात्मकतेमुळे एक पेच बनू शकतात आणि तणाव अधिकच वाढवू शकतात. दुर्दैवाने, तणाव सोरायसिसला अधिकाधिक दुर्धर बनवू शकतो.रुग्णांनी तणाव नियंत्रित ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी काही टिप्स खालीलप्रमाणे आहेत. ( हे पण वाचा-झटपट पोटाचा घेर कमी करायचाय? काकडीचा आणि पुदिन्याचा ज्यूस प्याल तर व्यायामाशिवाय बारीक व्हाल)

 नियमित व्यायाम करा

व्यायामामुळे  शरीरातील ‘एंडोर्फिन’ नावाच्या  रसायनांची पातळी वाढण्यास मदत होते जे चिंता कमी करण्यास, व्यक्तीची मनःस्थिती सुधारण्यास आणि ऊर्जेची पातळी वाढवण्यास मदत करतात, यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

 व्यावसायिक मदत घ्या  

रुग्णांसाठी सपोर्ट ग्रुप किंवा वैयक्तिक समुपदेशन सत्र तणाव कमी करण्यात आणि त्यांची चिंतेचे निवारण  करण्यासाठी मदत करू शकतात.

विश्रांतीसाठी वेळ ठरवा

रुग्णांना विश्रांती घेण्यासाठी आणि रिलॅक्स होण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. छंदात गुंतल्याने रुग्णांना तणाव कमी तसेच रिलॅक्स होण्यास मदत मिळू शकेल. तसेच उत्तम दर्जाचे मालिश केल्याने स्नायूंचा ताण आणि तणाव कमी होण्यास मदत होते. 

रुग्ण सोरायसिसवर करत असलेल्या उपचारांचा प्रभाव न दिसल्यास तणावग्रस्त असतात, म्हणूनच  रुग्णांनी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार औषधोपचार करणे अत्यावश्यक आहे. तथापि, लक्षणे सुधारत नसल्यास किंवा आणखी वाढत राहिल्यास, योग्य उपचार करण्यासाठी रूग्णांनी डॉक्टरांशी बोलणे आवश्यक आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स