शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्रालाही आहे दमा, जाणून घ्या या आजाराची लक्षणे आणि कारणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 10:13 IST

दमा म्हणजेच अस्थमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे ज्यात रुग्णाला श्वास घेण्यास समस्या होते. एकदा हा आजार झाला तर यापासून नेहमीसाठी सुटका मिळवणे कठीण आहे.

दमा म्हणजेच अस्थमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे ज्यात रुग्णाला श्वास घेण्यास समस्या होते. एकदा हा आजार झाला तर यापासून नेहमीसाठी सुटका मिळवणे कठीण आहे. हा आजार होण्याचं कारण एकतर धूळ माती मानलं जातं नाही तर जेनेटिक मानलं जातं. अभिनेत्री प्रियांका चोप्राही या आजाराने ग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. 

प्रियांका चोप्राचं म्हणनं आहे की, तिला दमा आहे आणि यात लपवण्यासारखं काहीच नाही. प्रियांकाने सोमवारी ट्विट करुन सांगितले की, तिला यात अजिबात कमीपणा वाटत नाही की, तिला दमा आहे. मला चांगल्याप्रकारे जाणणाऱ्या लोकांना माहीत आहे की, मला दमा आहे. आणि त्यात लपवण्यासारखं काय आहे? जोपर्यंत माझ्याकडे इन्हेलर आहे तोपर्यंत दमा मला माझं लक्ष्य मिळवण्यापासून रोखू शकत नाही'. 

 

काय आहे हा आजार?

दमा हा श्वसन तंत्राशी निगडीत आजार आहे. यात रुग्णाच्या श्वसननलिकेत सूज येते आणि यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या कारणाने छातीत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. आणि याने श्वास भरुन येतो. हा आजार कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. वयस्करांमध्ये हा आजार जास्त बघायला मिळतो. पण वाढत्या शहरीकरणामुळे आणि वेगवान लाइफस्टाइलमुळे लहान मुलांमध्येही हा आजार वाढताना दिसत आहे. 

दम्याची लक्षणे

१) कफ असलेला खोकला किंवा कोरडा खोकला

२) छातीत भरुन आल्यासारखे होणे

३) श्वास घेण्यास त्रास होणे

४) श्वास घेताना छातीतून आवाज येणे

५) रात्री आणि सकाळी स्थिती गंभीर होणे

६) थंड्या हवेत श्वास घेतल्यावर त्रास होणे

७) व्यायाम करताना श्वास भरुन येणे

८) जोरजोरात श्वास घेणे, यामुळे थकवा येणे.

काय आहे उपचार?

onlymyhealth.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, वेळीच जर या आजाराची लक्षणे दिसली आणि यावर योग्य उपचार केला तर दमा किंवा अस्थमा दूर करणे शक्य आहे. दम्याची लक्षणे ओळखून वेळीच डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावा. दमा चांगला करण्यासाठी जास्तीत जास्ती केसेसमध्ये इन्हेल्ड स्टेरॉइड(नाकातून दिलं जाणारं औषध) आणि इतर अॅंटी इंफ्लामेटरी औषधे दम्यात महत्त्वाची मानली जातात. यासोबतच ब्रोंकॉडायलेटर्स श्वसननलिकेतील मांसपेशींना आराम देतं. त्यासोबतच इन्हेलरचाही उपचार म्हणून वापर केला जातो. याच्या माध्यमातून फुफ्फुसांना औषध पोहोचवण्याचं काम केलं जातं. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सPriyanka Chopraप्रियांका चोप्रा