शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

सायलेन्ट हार्ट अटॅकची 'ही' आहेत लक्षणे, दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 10:53 IST

आपण सिनेमांमध्ये पाहिलं असतं की, हार्ट अटॅक आल्यावर छातीत जोरात वेदना होतात, खोकला येतो आणि व्यक्ती जमिनीवर पडतो. पण हे काही गरजेचं नाही.

(Image Credit : Cleveland Clinic Health Essentials)

जर तुम्हाला हार्ट अटॅक येणार असेल तर तुम्हाला कसं कळणार? सामान्यपणे आपण सिनेमांमध्ये पाहिलं असतं की, हार्ट अटॅक आल्यावर छातीत जोरात वेदना होतात, खोकला येतो आणि व्यक्ती जमिनीवर पडतो. पण हे काही गरजेचं नाही की, हार्ट अटॅक नेहमी काहीतरी संकेत देऊनच येईल. त्यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही वेळोवेळी तुमचं चेकअप करावं. डायबिटीस, हायपरटेंशन आणि लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

(Image Credit : health enews)

अनेक लोकांना वाटतं की, जेव्हा हार्ट अटॅक येईल तेव्हा त्यांच्या छातीत जोरात वेदना होतील आणि त्यांना कळेल की, त्यांना हार्ट अटॅक आलाय. पण अनेकदा हार्ट अटॅक कोणत्याही लक्षणांशिवायही अचानक येत असतो. याला सायलेन्ट हार्ट अटॅक म्हटलं जातं. याआधी तुमच्यात काही लक्षणे दिसतात, ज्यांवर वेळीच लक्ष देऊन उपचार घेतले पाहिजेत. 

छातीत प्रेशर

(Image Credit : Penn Medicine)

जर तुमच्या छातीत ब्लॉकेज असतील तर तुम्हाला छातीत दबावाची जाणीव होईल. अशात छातीत वेदना आणि प्रेशरही जाणवू शकतं. जर अशी काही लक्षणे दिसत असतील तर तुमच्यासाठी चिंतेची बाब आहे.

हात आणि खांदेदुखी

(Image Credit : KTAR News)

छातीत कळ येणे आणि खांदा-हाताकडे वेदना हळूहळू वाढत जाणे हार्ट अटॅकचं लक्षण आहे. अशात अनेकदा असंही होतं की, छातीत काही वेदना होत नाहीत. पण खांदे किंवा हातांमध्ये वेदना होते.

अचानक कमजोरी

(Image Credit : Achieve Clinical Research)

जर तुम्हाला अचानक चक्कर येत असेल किंवा तुम्हाला नीट उभंही राहता येत नाही अशी कमजोरी वाटत असेल, तर वेळीच आजूबाजूच्या लोकांना याची कल्पना द्या आणि डॉक्टरांना बोलवण्यास सांगा.

जबड्यामध्ये वेदना

नेहमीच जबड्यामध्ये किंवा घशात थंडी आणि सेंन्सिटीव्हिटीमुळे वेदना होतात. पण जर छातीत्या मधोमध वेदना होत असेल आणि हा त्रास हळूहळू जबड्याकडे सरकत असेल तर हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.

पाय आणि तळपायावर सूज

(Image Credit : Diabetes Self-Management)

जर तुमच्या पायांवर सूज असेल तर याचा अर्थ होतो की, हार्ट योग्यप्रकारे ब्लड पंप करू शकत नाहीये. हार्ट फेलिअरच्या आधी किडनी कमजोर होऊ लागते. ज्यामुळे पायांवर सूज येते. या लक्षणाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स