शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला माहित आहे का 'ऑईल पुलिंग' म्हणजे काय? अनेक आजारांवर आहे रामबाण, जाणून घ्या आत्ताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 15:30 IST

ऑईल पुलिंग म्हणजे काय आणि शरीराच्या समस्या दूर करण्यासाठी त्याचा वापर कसा करू शकतो ते जाणून घेऊया.

आपल्या चुकीच्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. यामुळे अनेक प्रकारच्या समस्याही निर्माण होतात. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतो. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यांचे सतत सेवन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही नैसर्गिक आणि हर्बल पद्धतींचा अवलंब करू शकता. अशीच एक पद्धत म्हणजे ऑईल पुलिंग.ऑईल पुलिंग म्हणजे काय आणि शरीराच्या समस्या दूर करण्यासाठी त्याचा वापर कसा करू शकतो ते जाणून घेऊया.

ऑईल पुलिंग म्हणजे काय?ऑईल पुलिंग ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. ज्यात शरीराच्या समस्या दूर करण्यासाठी विविध प्रकारचे तेल वापरले जाते. यामध्ये तिळाचे तेल, सूर्यफूल तेल आणि नारळाचे तेल वापरले जाते. ही सर्व तेले मिसळून तोंड धुवून त्यानंतर ब्रश केले जाते. यासाठी तुम्हाला सकाळी नाश्त्याच्या २० ते २५ मिनिटे आधी हे करावे. लक्षात ठेवा की, ऑईल पुलिंगच्या वेळी तेल गिळू नका. काही काळ तोंडात तेल हलवा आणि नंतर स्वच्छ धुवा. त्यानंतर ब्रश करा.

ऑईल पुलिंगचे फायदेऑईल पुलिंगसाठी सर्वोत्तम वेळ ही सकाळची असते. आयुर्वेदात देखील सकाळी रिकाम्या पोटी ऑईल पुलिंग करण्यास सांगितले आहे. हा उपाय केल्याने तोंडात असलेले जीवाणू आणि जंतू चांगले स्वच्छ होतात. नियमितपणे वापरल्यास, ते तोंडाची दुर्गंधी, हिरड्या सुजणे, दातदुखी, डोकेदुखी आणि त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करते.

ऑईल पुलिंगच्या वेळी ही खबरदारी घ्याऑईल पुलिंगच्या वेळी चुकूनही तेल गिळू नका. कारण त्यात भरपूर बॅक्टेरिया असतात जे शरीराला हानी पोहोचवू शकतात. नेहमी शुद्ध तेल वापरा. लहान मुलांनी ऑईल पुलिंग करणे टाळले पाहिजे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तेलाची अ‍ॅलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नका.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स