शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिडिटी झटपट दूर करण्यासाठी सकाळी करा तुळशीचं सेवन, कसं ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 11:45 IST

भारतीय घरांमध्ये तुळशीचं एक अनन्य साधारण महत्व आहे. तसेच तुळशीमध्ये अनेक औषधी गुणही आहेत. त्यामुळेच भारतीय घरांमध्ये तुळशीचं रोप बघायला मिळतं.

अ‍ॅसिडिटीची समस्या झाली की, व्यक्तीला दुसरं काही सुचत नाही. सतत पोटात गडबड होत राहते. मग अशात वेगवेगळे उपाय शोधण्याचा खटाटोप सुरू होतो. अनेकजण तर अ‍ॅसिडिटी दूर करण्याच्या टॅबलेट्स सोबत ठेवतात. पण आज आम्ही तुम्हाला अॅसिडिटी दूर करण्याचा एक नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे तुळशी. तुळशीच्या पानांनी तुम्ही झटपट अ‍ॅसिडिटी दूर करू शकता. चला जाणून घेऊ कशी....

भारतीय घरांमध्ये तुळशीचं एक अनन्य साधारण महत्व आहे. तसेच तुळशीमध्ये अनेक औषधी गुणही आहेत. त्यामुळेच भारतीय घरांमध्ये तुळशीचं रोप बघायला मिळतं. यातील औषधी गुण तर इतके प्रभावी आहेत की, एकापेक्षा जास्त समस्या फक्त तुळशीच्या रसाने दूर केल्या जाऊ शकतात. त्यातीलच एक म्हणजे अ‍ॅसिडिटी.

अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी...

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी अनेकांच्या लाइफस्टाईलचा भाग असतात. कारण कामाच्या धावपळीत लोक वेळेवर आणि हेल्दी पदार्थ खाऊ शकत नाहीत. याने पोटाशी संबंधित समस्या होऊ लागतात. त्यातील एक समस्या म्हणजे अ‍ॅसिडिटी. अ‍ॅसिडिटी झाली की, सतत आंबट ढेकर येऊ लागतात, पोटात दुखतं आणि अस्वस्थता जाणवते. सोबतच याचा त्वचा, डोळे आणि संपूर्ण आरोग्यावरही प्रभाव पडतो.

अशात नैसर्गिक उपायाने अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी तुळशीचं सेवन केलं जाऊ शकतं. तुळशी प्रभावी असण्यासोबतच सुरक्षितही आहे. कारण याचे सेवन करून कोणतेही साइड इफेक्ट होणार नाहीत. तुळशी शरीरातील टॉक्सिन बाहेर फेकण्यास मदत करते. सोबतच पोटात एंजाइम्स तयार होण्याची प्रक्रियाही वेगाने होते. यानेच अ‍ॅसिडिटी कमी होऊ लागते.

कसं कराल सेवन?

तुळशीचं तुम्ही दोन प्रकारे सेवन करू शकता. एक म्हणजे अनोशा पोटी तुळशीची ५ ते ८ पाने चाऊन खा आणि पाणी प्या.तर ज्या लोकांना अ‍ॅसिडिटी नेहमीच होते, त्यांनी रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यासोबत तुळशीच्या पानांचं सेवन करावं. यासाठी पाण्यात तुळशीची ४ ते ५ पाने बुडवून ठेवा. पाण्याच्या उष्णतेने पानांचा रस पाण्यात विरघळेल. या पाण्याने पोटाची समस्या लगेच दूर होईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य